आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाप्रमुख:शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख इंगळे शिंदे गटात

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबासाहेब इंगळे यांनी शिवसेनेचे उपनेते तथा माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. इंगळे यांनी अर्जुन खोतकर यांना पाठिंबा देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्य शासनाच्या भूमिकेचे समर्थन केले. हा छोटेखानी प्रवेश सोहळा सोमवारी भाग्यनगर येथील दर्शना बंगल्यावर झाला.

या वेळी शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब पाऊलबुद्धे, उपजिल्हाप्रमुख पंडित भुतेकर, परसराम यादव, विभागप्रमुख कांता रांजनकर, युवा सेनेचे दीपक वैद्य, गणपत धोतरे, गोपी नाटेकर आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...