आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोहळा:हसनाबादेत ग्राम संसद कार्यालयात शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात

हसनाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हसनाबाद येथील ग्राम संसद कार्यालयात ३४८ वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मागील वर्षीपासून राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन सर्व सरकारी कार्यालयात शासकीय उत्सव म्हणून साजरा करण्याचे आदेश दिलेले आहे. यावेळी गावचे प्रथम नागरिक सरपंच सुरेश लाठी यांच्या हस्ते भगवा झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून या सोहळ्यात सुरुवात झाली.

त्यानंतर गावातील उपस्थित नागरिकांनी शिवप्रतिमेचे पूजन करून छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी सरपंच सुरेश लाठी यांच्यासह ग्रामसेवक इरतकर, उपसरपंच बाबासाहेब जोशी, सोसायटीचे चेअरमन गणपत मैंद, व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष ईश्वर पठाडे, विजय जैस्वाल, सुनील सुरडकर, टिकाराम मिमरोट, शिवनाथ मोरे, कृष्णा खडेकर,सतीश वाल्डे, योगेश वैष्णव,सुरेश पवार,किशोर पालोदे, मैंद उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...