आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दणदणीत विजय:वरुड बुद्रुक सोसायटी निवडणुकीत शिवशाही विकास पॅनल एकतर्फी; सोसायटी निवडणुकीत सेनेने 13 पैकी 13 जागांवर यश मिळवला

केदारखेडा8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जाफराबाद तालुक्यातील मौजे वरुड बु. येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणूकीत शिवसेनेच्या गटाने राष्ट्रवादी व भाजपच्या गटाचा धुव्वा उडवत सर्वच्या सर्व १३ जागेवर दणदणीत विजय मिळवला.

१९ जून रोजी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या व राष्ट्रवादीच्या गटाचा पराभव करत शिवसेनेने १३ पैकी १३ जागा मिळवल्या आहे. त्यामुळे आता झालेली ही सोसायटीची निवडणूक दोन्ही पक्षासाठी प्रतिष्ठेची झाली होती. यात शिवसेनेने सर्व जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व निर्माण केले. विजयी उमेदवारांची गावातून डीजेच्या आवाजात गुलालाची उधळण करीत मिरवणूक काढण्यात आली. विजयी उमेदवारांत-शारदा सखाराम कदम, शांताबाई सुरेश वाघमारे, गजानन संपत शिंदे, भगवान पटीलबा ठाकरे, पांडुरंग किसन घायवट, शामराव रामा शेळके, संतोष पांडुरंग करडेल, देविदास महादू भेलके, विलास नारायण लोखंडे, देविदास लक्ष्मण डुकरे, संतोष शामराव सोलाट यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...