आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवस्वराज्यदिन:जाफराबादच्या सिद्धार्थ महाविद्यालयात शिवस्वराज्यदिन साजरा

जाफराबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

​​​​​येथील सिध्दार्थ महाविद्यालयात उपप्राचार्य डॉ. सुनील मेढे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रा. बी. बी. चव्हाण यांच्या उपस्थितीत शिवराज्यभिषेक दिन साजरा करण्यात आला. प्रा. चव्हाण यांनी शिवराज्याभिषेक दिनाचे महत्त्व सांगताना छत्रपती शिवाजी महाराज हे पहिले राज्याभिषेक करून घेणारे हिंदू राजे होत. असा लोकोत्तर राजा पुढे होणार नाही. असे सांगितले. तर उपप्राचार्य डॉ. सुनील मेढे यांनी अध्यक्षीय समारोपात छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याभिषेकदिन, स्वराज्य संस्थापक झाल्यानंतर समानतेवर आधारित लोकशाही राज्य निर्माण करण्यासाठी केलेले परिश्रम, शिवशाही व लोकशाही यावर विचार मांडले. प्रास्ताविक प्रा. डॉ. गजानन जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सुदाम पाटील यांनी तर प्रा. एस. एम. पाटील यांनी आभार मानले. यावेळी प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...