आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जालना:विद्युत पंप सुरू करताना लागला शॉक, आते-मामेभावाचा पाण्यात बुडून मृत्यू; 21 तासानंतर सापडले मृतदेह

बदनापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विहीर काठोकाठ भरलेली असल्याने 21 तासांनंतर सापडले युवकांचे मृतदेह

शेतीपंप सुरू करताना शाॅक लागल्याने विहिरीत पडून आते-मामेभावाचा मृत्यू झाला. बदनापूर तालुक्यातील कुसळी गावात शनिवारी दुपारी हा प्रकार घडला. ही विहीर काठोकाठ भरलेली असल्याने सायंकाळी उशिरापर्यंत मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते. प्रदीप कैलास वैद्य (18, रा. कुसळी) व गणेश कृष्णा तारडे (18, अंबड) अशी या मृतांची नावे आहेत.

गणेश हा अंबड येथील असून दिवाळीसाठी मामाच्या गावी आला होता. या घटनेने कुसळी गावावर शोककळा पसरली आहे. कुसळी ते माळेगाव रस्त्यावरील शिवाजी वैद्य यांच्या शेतीतील विहीर सध्या काठोकाठ भरलेली आहे. विद्युत पंप सुरू करून शेतीला पाणी सोडण्यासाठी प्रदीप व गणेश शनिवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास विहिरीकडे गेले होते. या वेळी शाॅक लागल्याने दोघेही विहिरीत पडून त्यांचा बुडून झाला. ही विहीर जवळपास 80 फूट खोल असून सध्या ती काठोकाठ भरलेली आहे. या घटनेची माहिती समजताच गावकऱ्यांनी तत्काळ विहिरीकडे धाव घेतली. या विहिरीत जवळपास 75 ते 70 फूट पाणी असल्यामुळे ते सापडले नाहीत. गावकऱ्यांनी गळ टाकून या तरुणांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. सायंकाळी उशिरापर्यंत हे काम सुरू होते.

22 नोव्हेंबर रोजी सकाळी पुन्हा शोध सुरू करण्यात आला असता सकाळी 10 वाजून 7 मिनिटाला प्रदीप वैध या तरुणाचा मृत्यूदेह गळाला लागून वर काढला तर 11 वाजता गणेश तारडे या तरुणाचा मृत्यूदेह काढण्यात आला. तब्बल 21 तासानंतर दोन्ही तरुणाचे मृत्यूदेह सापडले असून पुढील कारवाई सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...