आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घृणास्पद:लग्नाचे आमिष दाखवून जवानाचा पोलिस महिलेवर अत्याचार, नंतर दुसऱ्याच महिलेशी केले लग्न, जालन्यात गुन्हा दाखल

जालना2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

लग्नाचे आमिष दाखवत पुणे येथील जवानाने महिला पोलिस कर्मचाऱ्यावर अत्याचार करून दुसरीसोबत लग्न केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. महिला पोलिसाने दिलेल्या फिर्यादीवरून तालुका जालना पोलिस ठाण्यात पंकज मगर (रा. वर्धा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिला ही जालना जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कार्यरत आहे, तर आरोपी पंकज मगर हा पुणे राज्य राखीव पोलिस दलाचा जवान आहे. तो मूळचा वर्धा जिल्ह्यातील रहिवासी आहे. औरंगाबादमधील एका खासगी पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रात पीडित महिला आणि आरोपी यांची ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. पीडित महिला जालना जिल्हा मध्यवर्ती कारागृहात नोकरीला लागली, तर आरोपी पंकज मगर हा नंतर पुणे राज्य राखीव पोलिस दलात रुजू झाला. १० मे २०१८ पासून ते १५ जानेवारी २०२२ पर्यंत आरोपी जवान पंकज मगर याने लग्नाचे आमिष दाखवत पीडित महिलेशी शारीरिक संबंध ठेवले. दरम्यान, पीडित महिलेने लग्नासाठी तगादा लावला असता पंकज टाळाटाळ करत होता. अधिक चौकशी केली असता पंकज मगर याने डिसेंबर २०२१ मध्येच एका दुसऱ्या मुलीशी लग्न केल्याचे तिला कळले.

बातम्या आणखी आहेत...