आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित येथील दत्त जयंती निमित्त श्री स्वामी समर्थ नाम जप सोहळास प्रारंभ झाला असून यात ५८५ महिला व पुरुष सेवेकरी सहभागी झाले आहेत. सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत महिला तर रात्री ८ ते सकाळी ८ वाजेपर्यंत पुरुष अखंड नामजप सप्ताहात सहभाग नोंदवित आहे. दरम्यान श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र गुरु पिठाचे पीठासीन श्री गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे दिंडोरी यांच्या मार्गदर्शनात श्री स्वामी समर्थ बाल संस्कार व सेवा केंद्रात दत्त जयंती निमित्त सात दिवसीय अखंड नाम जप यज्ञ सुरू आहे.
यात गुरुचरित्र पारायण सोहळा विविध देवतांचे यज्ञ मंडपात मांडणी व पूजन तसेच सात दिवस अखंड रात्रंदिवस विना वादन श्री स्वामी समर्थ जप श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत आचे वाचन असे सुरू राहणार आहे. दरम्यान गुरुवारी ८ डिसेंबर रोजी सकाळी भूपाळी आरती, सत्यदत्त पूजन, त्यानंतर सकाळी साडेदहा वाजता महानैवेद्य आरती अखंड नामजप यज्ञ सप्ताह समारोप होईल. स्वामी समर्थ केंद्रातील प्रमुख सुदेश थारेवाल हे मार्गदर्शन करीत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.