आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:श्रीकृष्ण-रुक्मिणी बालोद्यान; जॉगिंग ट्रॅकचे उद्या लोकार्पण

जालना18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉयन्स क्लब ऑफ जालनाच्या सहकार्याने नवीन मोंढा रोडवरील श्रीकृष्ण रुक्मिणीनगर येथे श्रीकृष्ण रुक्मिणी चॅरिटेबल फाउंडेशन संचालित बालोद्यान आणि जॉगिंग ट्रॅक विकसित केला असून त्याचे लोकार्पण १५ जून रोजी सकाळी ९:३० वाजता प्रांतपाल दिलीप मोदी यांच्याहस्ते होणार असून यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन लायन्स क्लबच्या अध्यक्ष मीनाक्षी दाड यांनी केले आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे आमदार कैलास गोरंट्याल, नियोजित प्रांतपाल पुरुषोत्तम जयपुरिया, माजी प्रांतपाल विजयकुमार बगडिया, अग्रविभूषण पुरस्कार प्राप्त सुभाषचंद्र देविदान यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. श्रीकृष्ण रुक्मिणीनगर परिसरातील मुलांच्या विरंगुळ्यासाठी बालोद्यान तसेच नागरिकांना फिरण्यासाठी जॉगिंग ट्रॅक उभारण्यात आला आहे. जालना लायन्स क्लबचा हा स्थायी प्रकल्प असून कमलबाबू झुनझुनवाला यांनी विकासात सिंहाचा वाटा उचलला आहे. लॉयन्स चॅरिटेबल फाउंडेशन कडून लवकरच या बाल उद्यानात मुलांसाठी खेळणी उभारण्यात येणार आहे.

तसेच ट्रॅकच्या दोन्ही बाजूने वृक्ष, विविध फुलांची झाडे लावण्यात येणार आहेत, अशी माहिती अध्यक्ष मीनाक्षी दाड यांनी दिली. लोकार्पण सोहळ्याला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन लायन्स क्लबच्या अध्यक्ष मीनाक्षी दाड, सचिव जयश्री लढ्ढा, कोषाध्यक्ष प्रेमलता लोया, प्रकल्पप्रमुख कमलबाबु झुनझुनवाला, भास्कर दानवे, विजय दाड, गणेश कामड, श्रीकृष्ण रुक्मिणी चॅरिटेबल फौंडेशनचे अध्यक्ष अनिल कुरकुटे, सचिव गोविंद सांखला यांच्या वतीने करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...