आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंडित विजयकुमारजी पल्लोड (रा. औरंगाबाद) यांच्या मधूरवाणीत १० ते १६ नोव्हेंबर २०२२ दरम्यान श्रीमद् भागवत कथा यज्ञ हिरालाल सोनी यांच्या “नारायण निवास” गायत्री नगर, गायत्री मंदिराजवळ कथेचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज दुपारी २ ते ६ याकालावधीत ज्ञानयज्ञाच्या भक्तिमय शुभ प्रसंगी परमपूज्य पंडित विजयकुमारजी पल्लोड आपल्या मधुर वाणीने अमृतमय कथा सांगणार आहेत. गुरुवार १० नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता मंगल कलश मिरवणूक यात्रेने याची सुरुवात होणार आहे.
दि. ११ नोव्हेंबर शुक्रवार रोजी सच्चिचरित्र, ध्रुव चरित्र ध्रुव, शनिवार दि.१२ नोव्हेंबर श्री नरसिंह अवतार, रविवार दि.१३ नोव्हेंबर श्री कृष्ण जन्मदिवस, सोमवार दि. १४ नोव्हेंबर गोवर्धन पूजा, गोपी गीत, छप्पन भोग, मंगळवार १५ नोव्हेंबर दि श्रीकृष्ण रुख्मिणी मंगल विवाह, बुधवार दि. १६ नोव्हेंबर सुदामा पात्र आणि कथा समाप्तीची वेळ सकाळी ९ ते दुपारी १२ राहणार असून महाप्रसादाचे आयोजन दुपारी १२ ते २ यावेळेत करण्यात आले आहे. या श्रीमद भागवत कथा यज्ञ सोहळ्याचा सर्वांनी सहकुटुंब लाभ घ्यावा असे आवाहन हिरालाल नारायणदासजी सोनी, सुयोग,सचिन व सुमित सोनी यांच्या परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.