आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:श्रुतीची विद्यापीठाच्या क्रिकेट संघात निवड

अंबड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील मत्स्योदरी महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्रुती देशमाने हिची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुलींच्या क्रिकेट संघामध्ये निवड झाली आहे. राजस्थान येथे होणाऱ्या आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी ती सहभागी होणार आहे.

याबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार राजेश टोपे, संस्थेच्या सचिव मनिषा टोपे, प्रशासकीय अधिकारी डॉ. बी. आर. गायकवाड, प्राचार्य डॉ. शहाजी गायकवाड, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. प्रशांत तौर, डॉ.अनिल निंबाळकर, प्रा.जानकी कृतडीकर, डॉ.दिगंबर भुतेकर, पांडुरंग गहिरे आदींनी अभिनंदन केले आहे. श्रृतीला डॉ. प्रशांत तौर यांनी मार्गदर्शन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...