आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:"सिध्दार्थच्या खेळाडूंची खो-खो स्पर्धेमध्ये विभागीय स्तरावर निवड

जाफराबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रीडा युवक सेवा संचानालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद जालना यांच्या संयुक्त विद्यमाने कै. नानासाहेब पाटील विद्यालय नाजिक पांगरी जालना येथे खो- खो या खेळाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १९ वर्षातील मुलामध्ये सिध्दार्थ कनिष्ठ महाविद्यालयाने मंठा व अंबड या महाविद्यालयावर विजय संपादन केले. या खेळाडूची विभागीय स्तरावर निवड झाली आहेत. खो हे खेळाडू जालना जिल्हाचे नेत्रुत्व करणार आहेत.

या खेळाडूंमध्ये कर्णधार पवन माकोडे, कृष्णा जंजाळ ,शंकर पालकर, विष्णू जंजाळ, वैभव जंजाळ, विशाल लोखंडे, गोपाळ बनसोडे, प्रविण नलवडे, विनोद परदेशी,विशाल सूर्यवंशी, या खेळाडूनी आक्रमक, बाचावमक कौशल्य करून आपल्या संघास अजिंक्यपद पटकविले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. दादासाहेब म्हस्के, सचिव, सिनेट सदस्य प्रा. राहुल म्हस्के, प्राचार्य डॉ. श्याम सर्जे, उपप्राचार्य डॉक्टर सुनील मेढे, डॉ. रमेश देशमुख, कनिष्ठ प्राचार्य विनोद हिवराळे यांच्यासह जिल्हा क्रीडाधिकारी आदींनी अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...