आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहीम:अंबड चौफुली ते उड्डाणपूल रस्त्यासाठी स्वाक्षरी मोहीम

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील खड्डेमय झालेल्या नूतन वसाहत रेल्वे उड्डाणपूल ते अंबड चौफुली, गांधी चमन ते रेल्वेस्टेशन व जिजामाता प्रवेशद्वार ते सिंदखेडराजा चौफुलीपर्यंत रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याच्या मागणीसाठी बुधवारी जालनेकरांनी स्वयंस्फूर्तीने स्वाक्षरी मोहीम राबवली. यात दिवसभरात दीड हजार नागरिकांनी स्वाक्षरी करून या रस्त्याचे काम तत्काळ सुरू करण्याची मागणी केली. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह संबंधित विभागाला पाठवले जाणार आहे.

विद्यार्थी, महिला, वयोवृद्ध, अधिकारी-कर्मचारी, व्यापारी, उद्योजक यासह सर्वच क्षेत्रांतील नागरिकांना या रस्त्यासाठी सह्या करण्याचे आवाहन करण्यात आले होते, यानुसार मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्यामुळे यातून वाहन चालवणे, पायी चालणे अवघड होऊन बसले आहे. या ठिकाणी अनेकदा छोटे-मोठे अपघात झालेले आहेत. यासंदर्भात वारंवार निवेदन, उपोषण, तक्रारी देऊनही रस्त्याचे मजबुतीकरण केले जात नाही.

थातूरमातूर खड्डे बुजवले जातात. १५ दिवसांनंतर पुन्हा रस्ता उखडताे. संबंधित रस्ते नगरविकास विभागाकडून मंजूर करण्यासंबंधी तत्काळ मुख्याधिकाऱ्यांना आदेश देऊन तसा प्रस्ताव शासनास सादर करण्याचे सांगावे, असेही निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, या मोहिमेत पादचारी, दुचाकीस्वार, अॉटोरिक्षाचालक, चारचाकी तसेच मालवाहू वाहनधारकांनीही सहभाग नोंदवला. नागरिकांनी घेतलेला हा पुढाकार दिवसभर लक्षवेधी ठरला.

बातम्या आणखी आहेत...