आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारेशीम उत्पादक शेतकऱ्यांना एकरी प्रत्येकी एक लाखाचे पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असून नाबार्डकडून सर्व बँकांना तशा सूचना दिल्याची माहिती बँकिंग सूत्रांनी दिली. मात्र, हे पीक खर्चिक असल्यामुळे किमान पाच लाख रुपये पीक कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी रेशीम उत्पादकांकडून केली जात आहे. महारेशीम अभियानांतर्गत जिल्ह्यात वर्ष २०२३-२४ या वर्षात एक हजार एकरवर तुती लागवडीचे उद्दिष्ट असून प्रत्यक्षात १०३७ एकरवर लागवडीसाठी शेतकऱ्यांनी संमती दर्शवली आहे. मागील लागवड ८५१ एकर आहे. अर्थात, येत्या वर्षात जिल्ह्यात दोन हजार एकर तुतीचे क्षेत्र राहणार अाहे. दरम्यान, लागवडीपासून ते काढणीपर्यंतचा खर्च लक्षात घेता बँकांकडून प्रतिएकरी एक लाख रुपयांचे पीक कर्ज रेशीमसाठी उपलब्ध करून देण्यात यावे, असा प्रस्ताव ४ जानेवारी २०२३ रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा तज्ज्ञ समितीच्या सभेत मांडण्यात आला होता. यास सर्वानुमते संमती दर्शवल्यामुळे येत्या हंगामापासून प्रतिएकरी एक लाख रुपयांचे पीक कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
एकरी पाच लाख रुपयांच्या पीक कर्जाची मागणीशासनाने प्रतिएकरी पाच लाखांपर्यंत पीक कर्ज उपलब्ध करून दिल्यास अधिकाधिक शेतकरी तुती लागवड करून रेशीम उत्पादन घेतील. शिवाय, हे नगदी पीक असल्यामुळे घेतलेल्या पीक कर्जाची परतफेडही दर महिन्याला होऊ शकते. यामुळे बँकांनी रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना पीक कर्ज देऊन सहकार्य करावे. - भाऊसाहेब निवदे, मच्छिंद्रनाथ चिंचोली, ता. घनसावंगी
जिल्ह्यात ८५१ एकरांवर रेशीमची शेती, नव्याने १०३७ शेतकरी इच्छुक जिल्ह्यात ८३८ रेशीम उत्पादक शेतकरी असून ते ८५१ एकरांवर रेशीमची शेती करतात. नवीन शेतकरी नोंदणी १०३७ आहे, तर जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत रेशीमची बाजारपेठ आहे. या ठिकाणी मराठवाडा, विदर्भातील शेतकरी काेष विक्रीसाठी आणतात. त्याचबरोबर दरेगाव शिवारात शासनाने मंजूर केलेल्या रेशीम बाजारपेठेचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे येत्या काळात रेशीम उत्पादकांसाठी अधिकाधिक सुविधा उपलब्ध होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.