आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:रामसगावात हरिनाम सप्ताहाचा रौप्य महोत्सव; रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध धामिक कार्यक्रमांची रेलचेल, गावात उत्साह

तीर्थपुरी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घनसावंगी तालुक्यातील श्री क्षेत्र रामसगाव येथे अखंड हरिनामसप्ताह सुरु झाला असून यावर्षी अखंड हरिनाम सप्ताहाला २५ वर्ष पूर्ण होत आहेत. रौप्य महोत्सवीवर्ष साजरे करताना गाव भक्तीसागरात बुडाले आहे.

२७ मार्च २०२२ पासून अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात झाली असून यानिमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत. ज्यामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, श्री विठठल रुख्मीणी व संकट मोचक हनुमान या देवतांच्या मुर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच कलशरोहन कार्यक्रम देवीदास महाराज आहेर यांच्या आशिर्वादाने व रामकृष्ण बाबा पुरी भोगलगावकर यांच्या प्रेरणेने होत आहे. यावेळी नंदुमहाराज जाधव, योगेश महराज गायके, गजानन महराज सोळुंके, अशोक महराज चिगुरे, पांडुरंग महाराज उगले, प्रभाकर महाराज सुरासे, सिध्देश्वर महाराज दगडगावकर, दिनकर महाराज चिमणे यांचे कीर्तन, कलश रोहन कार्यक्रम स्वामी बालकानंद सरस्वतीजी महाराज यांच्या हस्ते ३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता रामसगावच्या (माहेरवासीनी) लेकी व जावई यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

वेदांताचार्य महंत मधुसुदन महाराज गवारे यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता ४ एप्रिल रोजी सकाळी ९ होणार आहे. यावेळी पालकमंत्री राजेश टोपे उपस्थित राहणार आहेत. पंचक्रोशीतील भाविकांनी कीर्तनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...