आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षणासाठी आंदोलन:मराठा आरक्षणासाठी साष्टपिंपळगावात ठिय्या आंदोलन; हजारो ग्रामस्थ दाखल, महिलांचा उत्सफूर्त प्रतिसाद

जालना6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या आंदोलनात इतर समाजातील बांधव सहभागी, त्यांचाही या मागणीला पाठींबा, संयोजकांचा दावा

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंबड तालुक्यातील (जि.जालना) संपूर्ण साष्टपिंपळगाव येथे आजपासून राज्यव्यापी ठिय्या आंदोलन व आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे. यात हजारो ग्रामस्थ सहभागी झाले असुन महिलांची संख्या लक्षणीय आहे.

या आंदोलनाला आज प्रारंभ झाला. आंदोलनस्थळी वेळेपूर्वीच मोठ्या संख्येने समाज बांधव दाखल झाले. साष्टपिंपळगावासह आसपासच्या गावातील ग्रामस्थही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. गावात मोठा मंडप उभारण्यात आला असुन तेथे हे आंदोलन सुरु आहे. ठिय्या आंदोलनापूर्वी गावातून विशाल मिरवणूक काढण्यात आली. ट्रॅक्टर, बैलगाड्या, मेंढरं-शेळ्या,मोटारसायकल रॅली,लेझीम पथक,बँड पंथक यात सहभागी झाले आहेत. शिवाय मराठा समाजातील आबालवृध्दही यात सहभागी झाले आहेत. या आंदोलनात इतर समाजातील बांधव सहभागी झाले असुन त्यांनीही या मागणीला पाठींबा दिल्याचा दावा संयोजकांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...