आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणाची एसआयटीकडून चौकशी; सामाजिक कार्यकर्ते रमेश देहेडकर यांची मागणी

जालना7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना शहरातील ढवळेश्वर परिसरात समोर आलेल्या स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत करण्याची मागणी जालना शहरातील सामाजिक कार्यकर्ते रमेश देहेडकर यांनी पोलीस महासंचालक यांच्याकडे केलीय. पोलीस तपासात अनेक बाबी समोर येत नसल्याने त्यांनी याप्रकरणी ऑनलाइन तक्रार करत ही मागणी केली.

२९ एप्रिल रोजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अर्चना भोसले यांनी जालना शहरातील ढवळेश्वर परिसरात असलेल्या राजुरेश्वर क्लिनिक वर छापा मारून येथील स्त्रीभ्रूणहत्येचा गोरखधंदा समोर आणला होता. या प्रकरणात त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चंदंजिरा पोलीस ठाण्यात या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या तोतया डॉक्टरसह त्याला मदत करणाऱ्या काही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणात तोतया डॉक्टरसह काही जणांना ताब्यात घेतले होते. मात्र अद्यापही या प्रकरणात पोलिसांनी सोनोग्राफी मशीन जप्त केलेले नाही. किती स्त्रीभ्रूणहत्या केल्या हे देखील समोर आल नाही.

बातम्या आणखी आहेत...