आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या दीड ते दोन महिन्यांपासून जाफराबाद शहर तथा परिसरात सकाळच्या पाच वाजे पासून ते अकरा वाजेपर्यंत महावितरणाने तब्बल सहा तासांचे भारनियमण सुरु केलेले असुन ऐन दहावी बारावीसह इतरही वर्गाच्या परीक्षा तोंडावर आल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन भारनियमन रदद् करुन सुरळीत वीज पुरवठा करावा, अशी मागणी केली आहे.
अभ्यासासाठी सकाळची वेळ उपयुक्त असते त्यामुळे सकाळी सकाळी केलेला अभ्यास विद्यार्थ्यांच्या स्मरणात राहतो. अगोदरच दोन वर्ष कोरोनामुळे शिक्षणाची वाट लागलेली असुन नुकतेच कसे तरी शिक्षण प्रणाली पुर्वपदावर येत आहे. मात्र आता भारनियमनाने घाट घातला असुन यामुळे विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा तणाव येत असुन ऐन परीक्षेच्या तोंडावर भारनियमन केले जात असल्याने संताप व्यक्त केले जात आहे. सध्या शेतीत कापुस वेचणी, गहु, हरबरा निंदणी तथा ओलविण्याचे काम सुरु असल्याने सकाळच्या आठ वाजताच मजुर कामासाठी शेतावर असते मात्र या भारनियमनामुळे महिला मजुरांना सकाळी तीन वाजतापासुनच स्वयंपाकासाठी उठण्याची वेळ आली आहे.
विज गुल होण्यापूर्वी वीजेवर अवलंबून असलेली कामे करुन घेतली जात आहे. त्यामुळे सहा तासाचे भारनियमन बंद करावे किंवा त्याचा वेळ बदलावा अशी मागणी सर्व स्तरातुन केली जात आहे. तसेच विजेवर चालणारे इलेक्ट्रॉनीक व इलेक्ट्रिशनचे व्यवसायही सकाळी अकरा वाजेपर्यंत ठप्प असतात. वरिष्ठांनी लक्ष देऊन सुरळीत वीज पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
भारनियमनामुळे अभ्यासच होत नाही
मी सिध्दार्थ महाविद्यालयातील इयत्ता ११ वी सायन्सची विद्यार्थीनी असुन या सहा तासाच्या भारनियमनामुळे गृहपाठ, वाचन, पाठांतर तसेच कुठलाच अभ्यास होत नसुन यामुळे तणाव वाढला आहे. घरात इन्व्हटरची सुविधा नाही. अभ्यास कसा करावा व कसे परीक्षेला सामोरे जावे हा प्रश्न भेडसावत आहे. ही गैरसोय दुर करावी, अशी मागणी विद्यार्थिनी निकिता लोणकर हिने केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.