आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्री शिवाजी हायस्कूलचे विद्यार्थी आले एकत्र:सोळा वर्षांनंतर भरला दहावीच्या वर्गमित्रांच्या आठवणींचा वर्ग

सिंधी काळेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जालना तालुक्यातील साखर कारखाना येथील श्री. शिवाजी हायस्कूल येथील वर्ष २००६ मधे दहावीच्या वर्गात शिकलेले विद्यार्थी यंदा दिपावलीच्या स्नेहमिलनाच्या कार्यक्रम निमित्त राममुर्ती येथे एकत्र आले. या वेळी पुर्ण वर्ग मित्राची तब्बल सतरा वर्षानंतर भेट झाल्याने सर्व आनंदी होते. या वेळी जून्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

सध्या दिपावलीनीमीत्त स्नेहमिलनाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येत आहे. आपणही एकत्र यावे असा मानस ठेवत येथील श्री. शिवाजी हायस्कुल मध्ये २००६ या वर्षात इयत्ता दहावीत शिकलेल्या विद्यार्थ्यांनी नियोजन केले. सर्व मित्र एकत्र भेटण्यासाठी काही मित्रानी स्नेहमिलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करत सर्वांना नियोजन कळवले. या वेळी प्रत्येकाने नियोजनाचा भाग होत आयोजनात सहभाग नोंदवला. या निमीत्ताने सर्व जुने मित्र एकत्र आले व जुन्या शाळेतील आठवणींना उजाळा मिळाला. या विद्यार्थ्यांनी त्या वेळचे शिक्षक वृंद यांनाही कार्यक्रमासाठी बोलवण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख अक्तर आणि सदाशिव भूतेकर यांनी केले.

तर लक्ष्मण गिराम, शंकर वायाळ, शेख वशिम यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच सर्व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. या वेळी शेख अक्तर, लक्ष्मण गिराम, राम गिराम, रवी गिराम, ज्ञानेश्वर गिराम, सदाशिव भुतेकर, शंकर वायाळ, शेख वशिम, धनजय गायकवाड, सुदर्शन मोकाटे, योगेश राऊत, विलास हनवते यावेळी शिक्षकांमध्ये भाऊसाहेब गोरे, परदेशी दोंगरदिवे, खरात, सोळुंके, तिरूके, प्रधान, राजपूत, जायभाय, भागवत, चव्हाण व सर्व शिक्षकांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली.

विविध क्षेत्रात स्थिरावले मित्र
त्यावेळचे वर्गमित्र आता भेटत नाही. यातील काही सोबती हे कंपनी तसेच नोकरीत व्यस्त आहे. काहींना देश सेवेची संधी मिळाली आहे. शासकीय सेवा, व्यवसाय तसेच शेती यामध्येही काहीजण व्यस्त झाले आहे. वर्गमीत्र हे अनेक वर्षानंतर एकत्र येणार याची खुशी सर्वांनाच झालेली होती. प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी वर्गमित्रांनी आठवणींचा वर्ग भरूवुन आपल्या भावनांची वाट मोकळी करून दिली.दरम्यान, यावेळी एकत्र आलेल्या वर्ग मित्रांनी पुढील काळात एकमेकांना संकट काळात मदत करण्यासाठी उभे राहण्याचा निर्णय घेतला. तर सोशल मिडीयाच्या माध्यमातून एकत्र राहण्याचाही संकल्प या वेळी केला.

बातम्या आणखी आहेत...