आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सल्ला:व्हिडिओ गेम सोडून‎ क्रीडांगणाची कास धरा

जालना‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे‎ व्हिडिओ गेमच्या आहारी गेलेल्या‎ शालेय विद्यार्थ्यांमध्ये दृष्टीदोष‎ वाढत चालला असून बालवयात‎ चष्मे लागत आहेत. विद्यार्थ्यांनी‎ व्हिडिओ गेम ऐवजी क्रीडांगणावर‎ जाऊन मैदानी खेळांची कास‎ धरावी, असा सल्ला भाजपचे‎ शहराध्यक्ष राजेश राऊत यांनी‎ दिला.‎ इनडोअर फुटबॉल‎ असोसिएशनच्या वतीने आयोजित‎ राज्यस्तरीय कुमार गट आणि‎ खुल्या स्पर्धेच्या पारितोषिक‎ वितरण प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी समाजसेवक संजय देठे,‎ जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे‎ सचिव रमेश शेळके, फुटबॉल‎ प्रशिक्षक तथा आयोजक शेख‎ जावेद, इनडोर फुटबॉल‎ असोसिएशनचे राज्य सचिव‎ दीपक निकम, जिल्हाध्यक्ष शेख‎ मुजाहेद यांची उपस्थिती होती. दोन‎ दिवस चाललेल्या स्पर्धेत‎ राज्यभरातून १४ संघ सहभागी‎ झाले. दोन्ही गटांमध्ये जालनाच्या‎ संघांनी कसदार कामगिरी करत‎ विजेतेपदाचा मान मिळवला.‎ कुमार गटात शेख मलिक तर‎ खुल्या गटात करण वाघमारे हे‎ //"प्लेयर ऑफ द टूर्नामेंट//" ठरले.‎ सूत्रसंचालन अविनाश वाघ यांनी‎ तर प्रशिक्षक शेख जावेद यांनी‎ आभार मानले.

यावेळी खेळाडू,‎ संघ प्रमुख व प्रशिक्षकांची‎ उपस्थिती होती. दरम्यान फेब्रुवारी‎ महिन्यात गोवा येथे होणाऱ्या‎ राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी‎ जालनाचे संघ पात्र ठरले असून ते‎ महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व‎ करतील,असे प्रशिक्षक शेख‎ जावेद यांनी सांगितले. दरम्यान,‎ राज्यस्तरीय कुमार आणि खुल्या‎ अशा दोन गटात झालेल्या स्पर्धेत‎ जालना जिल्हा संघाने विशेष‎ कामगिरी करीत आपले वर्चस्व‎ सिध्द करुन दाखवले आहे.‎ याबद्दल जालनाच्या संघातील‎ खेळाडूंचे जिल्हाभरात अभिनंदन‎ केले जात आहे.‎

बातम्या आणखी आहेत...