आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साथीच्या आजाराला आळा:रोगराई नियंत्रणात ठेवण्यासाठी सिंधी काळेगावात धूर फवारणी

सिंधीकाळेगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने अनेक ठिकाणी डबके साचलेले असतात. त्यामुळे डासाचे प्रमाण वाढले आहे.परिणामी ग्रामस्थांना साथीचे आजार उद्भवू शकतात. याची खबरदारी म्हणून जालना तालुक्यातील सिंधी काळेगाव ग्रामपंचायतच्या वतीने गावात धूर फवारणी करण्यात येत आहे. त्यामुळे साथीच्या आजाराला आळा घालण्यासाठी ग्रामपंचायत कडून प्रयत्न सूरू आहे. तसेच ग्राम पंचायत कडून होणार्या पाणीपुरवठ्याच्या विहरीत सूद्धा पाणी शुद्ध करण्यासाठी बिलच्चींग पावडरचा वापर करण्यात येत असल्याचे सरपंच सुभाष गिराम यांनी सांगीतले.

जालना तालुक्यातील सिंधी काळेगाव येथे ग्राम पंचायत च्या वतीने दोन दिवसापासून गावात धूर फवारनी करण्यात येेत आहे. फॉर्गीन मशीन द्वारे संंपुर्ण गावात धूर फवारनी करण्यात येत आहे. पावसाळ्याच्या दिवसात डासाची उत्पत्ती वाढते असते. त्यामुळे सर्दी, ताप, खोकल्याचे रूग्न वाढत आहेत. त्यामुळे साथीचे आजार पसरवू नाही म्हणून ग्रामपंचायत तसेच आरोग्य विभागाकडून सिंधी काळेगाव येथे धूरफवारनी करण्यात येत आहे. यावेळी सरपंच सुभाष गिराम, उपसरपंच सय्यद रशीद, ग्रामसेवक मिलींद कोरके, ग्रामपंचायत सदस्य विष्णुपंत गिराम, भागवत गिराम, साळूकराम गिराम, जनार्धन गिराम, राम खर्जूल, सकाराम मगर, गोपीनाथ शेळके सय्यद हनीप, ग्राम पंचायत कर्मचारी बाबासाहेब वैद्य, सय्यद उस्मान यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...