आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासमाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात अनेक ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. प्रतिमापूजन, कार्याला उजाळा, विविध स्पर्धा, रॅली, मिरवणूक काढण्यात आली.
जिजाऊ इंग्लिश स्कूल
जाफराबाद | येथील राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूलमध्ये महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संजय फलटणकर होते. त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांनी अस्पृश्यांसाठी घरातील पाण्याचा हौद खुला करून दिला तसेच बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून विधवा विवाहास प्रोत्साहन दिले. अशा असंख्य समाजातील कामे करून समाज सुधारणेचा झेंडा सर्वदूर फडकवला असल्याचे सांगितले. यावेळी रवींद्र धारकर, नावेद खान, विनोद बोराडे, अमोल पाटील, अंकुश पंडित, सुनिता मोरे, गीता पठाडे, आयेशा शेख, मंजुषा बोराडे , सतीश मोठे आदी उपस्थित होते.
सिद्धार्थ महाविद्यालय
जाफराबाद | येथील सिद्धार्थ महाविद्यालयात महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंती कार्यक्रमास प्राचार्य डॉ. शाम सर्जे, उपप्राचार्य डॉ. सुनील मेढे, विनोद हिवराळे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. सुनील मेढे यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवन चरित्राचा आढवा घेतांना समतेचे विचार महत्वाचे असून महात्मा फुले यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा विचारात घेतल्या शिवाय व त्यांच्या साहित्याचा अभ्यास केल्याशिवाय सामाजिक समता समजणार नाही. असे उपस्थितांना सांगितले.
शाहू महाराज विद्यालय
सिंधी काळेगाव | जालना तालुक्यातील डुकरी पिंपरी येथील राजर्षी छञपती शाहू महाराज विद्यालयात महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक सी. जी. वाघमारे, एस. आर. कुलकर्णी, वाय. बी. मदन, डी. एन. सोनकांबळे, पी. पी. नागरे, ए. बी. देशपांडे, एल. बी. जाधव, आर. एस. ठाकरे, एस. बी. राऊत, एम. ए. खरात आदींची उपस्थिती होती. यावेळी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या ‘जीवन चरित्र व शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकला.
जि.प.प्रा.शा. सारवाडी
जालना | तालुक्यातील सारवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्ता काळे, विलास नरवडे, चक्रधर बागल, जनाबाई भुंबे, ज्येष्ठ प्राथमिक पदवीधर शिक्षक ज्ञानेश्वर गिराम, मुख्याध्यापिका विश्वलता गायकवाड यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
शालेय साहित्य वाटप
टेंभूर्णी | महात्मा फुले यांच्या जयंतीच्या निमित्त टेंभूर्णी येथील सामाजिक कार्यकर्ते रवी खरात यांनी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, पेन या शालेय साहित्याचे वाटप केले. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश खरात, माळी महासंघाचे शहराध्यक्ष शंकर मुळे, जिल्हा परिषद शाळेचे केंद्रप्रमुख आर. डी. लहाने, सामाजिक कार्यकर्ते गणेश सातभाई, गोपाल कुधले, आनंदा माने, योगेश जमधडे, अमोल जमधडे, सुशील तांबेकर, संतोष मैद, गौतम छडीदार, शिवम खरात, समाधान खरात, सोमनाथ सोनसाळे, विठ्ठल जोशी, शारेक सिद्धिकी यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
सेलूत विशेष कार्यक्रम
सेलू | जयंती ही समाजापूर्ती न ठेवता तिला व्यापक स्वरूप प्राप्त व्हावे .या उद्देशाने फुले व आंबेडकर यांच्या जयंती निमित्त या “सन्मान कर्तृत्वाचा “ कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केलेल्या व्यक्तीचा सन्मान करण्याचा प्रयत्न केला आहे .सर्व सामन्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान व्हायला पाहिजे यासाठी दरवर्षीच हा कार्यक्रम केला जाईल, असे जि. प. सदस्य अशोकराव काकडे यांनी सांगितले. महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कै आण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्था सेलूच्या वतीने सेलू शहरातील सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, पत्रकारिता, वैद्यकीय, व्यावसायिक व सांस्कृतिक आदी क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या मान्यवरांच्या सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी उद्योजक रामप्रसाद घोडके तर प्रमुख पाहुण्या म्हणून राष्ट्रवादीच्या युवती अध्यक्ष प्रेक्षा भांबळे-बोराडे, जयप्रकाश बिहानी, नंदकिशोर बाहेती, महेश खारकर, रामेश्वर राठी, बाजार समितीचे सभापती रणजित गजमल, शिवसेना शहर प्रमुख मनीष कदम, पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक अंभोरे, राम साेनवणे, शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हाप्रमुख मंगला कथले, अशोक उफाडे, सतीश दिग्रस्कर, रहीम पठाण, रघुनाथ बागल आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक राधाकिशन महाराज हिस्सीकर यांनी केले. यावेळी .विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या ३५ कर्तृत्ववान व्यक्तीचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन बोराडे यांनी तर बाबासाहेब हेलसकर यांनी आभार मानले.
सामाजिक कार्यक्रम सप्ताह
जालना | डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था( बार्टी), पुणे संलग्न नालंदा बहुद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त सामाजिक समता सप्ताह अंतर्गत क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त आयोजित सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रम सप्ताहास सोमवारपासून प्रारंभ झाला. यावेळी आरटीओ प्रियंका छडीदार, भास्कर शिंदे, विश्वजित शिंदे, प्रदीप अवचार, जितेंद्र पटेकर, विवेक मेश्राम, आनंद वाहुळकर, संभाजी गंगावणे यांची या सप्ताहात वाद-विवाद स्पर्धा, चित्रकला, नृत्य, गीतगायन, निबंध लेखन, बुद्धिबळ, प्रश्नमंजुषा, अंताक्षरी, शेला पागोटे, नाटक, रक्तदान आदी कार्यक्रम आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.