आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथील सोसायटी बिनविरोध निवडीची परंपरा यंदाची कायम राहिली आहे. संचालक मंडळ निवडीनंतर चेअरमनपदी गणपत मैंद तर व्हा. चेअरमनपदी दत्तू पाटील इंगळे यांची बिनविरोध निवड़ करण्यात आली.
हसनाबाद सोसायटीची स्थापना ৭९५९ ला झाली. या सोसायटीत ४६१शेतकरी कर्जदार व बिगर कर्जदार मतदारांची नोंद आहे. २०१२ वगळता आतापर्यंत सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार पडली. यंदाही सरपंच सुरेश लाठी, धोंडिबा श्रीनाथे यांच्या नेतृत्वात बिनविरोध निवड करण्यात आली.
संचालक म्हणून विजय जैस्वाल, वंदना खरात, द्रोपदाबाई मैंद, एकनाथ खड़ेकर, इस्माईल शेख इब्राहिम शेख, म्हातारबा सोरमारे, कान्हू खड़ेकर, सुधाकर महाशब्दे, साहेबराव दुधे, गणी शेख, बिसन रामफळे यांचा समावेश आहे. या निवडीनंतर पदाधिकाऱ्यांचा सत्कार करुन फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.