आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षण:जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधून आज केव्हीकेद्वारे माती परीक्षण

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या ५ डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधून खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने प्रत्यक्ष नमुने घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांच्या माती नमुन्यांची सर्वसाधारण चाचणी मोफत करून देणार असल्याचे कृषि विज्ञान केंद्राद्वारे कळविण्यात आले आहे.

या चाचणीत जमिनीचा सामू, क्षारता, सेंद्रिय कर्ब, उपलब्ध नत्र, उपलब्ध स्फुरद, उपलब्ध पालाश, मुक्त चुनखडी, क्याल्शिअम, मॅग्नेशिअम आणि उपलब्ध गंधक या घटकांचा समावेश होतो. फक्त जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नमुनेच मोफत तपासून देण्यात येतील. एका शेतकऱ्याकडून एकच नमुना स्विकारण्यात येईल. सकाळी ११.०० ते दुपारी २ ०० वाजेपर्यंत येणारे नमुनेच मोफत तपासणीसाठी ग्राह्य धरण्यात येतील. जागतिक मृदा दिना निमित्त शेतकऱ्यांना जमिनीचे आरोग्य, मृदा आरोग्य पत्रिका व त्यांचा वापर याबाबत तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात येईल, तरी शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख एस.व्ही.सोनुने यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...