आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीचे पडघम:आरक्षण सोडतीनंतर परतूर शहरातील राजकारणात कहीं खुशी, कहीं गम; सर्वच पक्षांतील ओबीसी उमेदवारांना करावी लागणार कसरत

परतूर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी पालिका निवडणूकीसाठी निवडणूक आयोगाने सदस्यांसाठीचे आरक्षण सोडत जाहीर केल्यानंतर शहराच्या राजकारणात कही खुशी, कही गम अशी स्थिती असल्याचे पाहायला मिळाली. ओबीसी आरक्षणाविना ही निवडणूक होत असल्याने मागील पंचवार्षिकमध्ये ओबीसी कोट्यातून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींमध्ये नाराजीचा सुर पाहायला मिळत आहे. खुल्या प्रवर्गातून निवडून येण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे.नव्याने निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांमध्ये खुशीचे वातावरण पाहायला मिळाले.

जिल्हा नियोजन समितीच्या माजी सदस्या तथा माजी नगरसेविका प्रतिभा सिद्धार्थ बंड यांचा प्रभाग १ याही वेळी अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांना या ठिकाणावरून दुसऱ्यांदा लॉटरी लागण्याची शक्यता आहे. या प्रवर्गात त्यांच्या विरोधात प्रबळ दावेदार नसल्याने याही वेळी प्रतिभा बंड पुन्हा नगरसेवक पदाच्या दावेदार मानल्या जात आहेत. या प्रभागातील दुसरी जागा सर्व साधारण प्रवर्गासाठी खुली असल्याने या जागेसाठी प्रचंड रस्सीखेच असल्याचे आढळून येते. माजी उपनगराध्यक्ष सादेक खतीब यांच्यासाठी ही धोक्याची घंटा ठरण्याची शक्यता आहे. प्रभाग दोन मध्ये आरक्षणात आदलाबदल झाल्याने माजी नगरसेवक जगन्नाथ बागलयांचा पत्ता कट झाला आहे. गतवेळी अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव असलेली जागा यावेळी अनुसूचित जमाती सर्वसाधारण साठी राखीव झाली आहे. या जागेवर साहजिकच अनुसूचित जमातीमधील पुरुष उमेदवाराला संधी मिळणार हे जवळपास निश्चित आहे आहे.

दुसरी जागा सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असल्याने या जागेसाठी देखील मोठी स्पर्धा असल्याचे पाहायला मिळते. गतवेळी थोड्या फरकाने पराभव स्वीकारावा लागणारे गणेशराव पवार यंदा या ठिकाणावरून प्रबळ दावेदार मानले जात आहेत. प्रत्येक निवडणूकीत अटीतटीची लढत होणारा प्रभाग क्र ८ मध्ये माजी उपनगराध्यक्ष भाजपचे संदीप बाहेकर यांचा मतदार संघ याही वेळी सेफ मानला जात आहे. त्यांच्यासोबत ओबीसी कोट्यातून निवडणून आलेल्या संजीवनी सातोनकर यांना यावेळी खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढवावी लागणार आहे.

प्रभाग ९ मध्ये शिवसेनेचे जिल्हा संघटक मोहन अग्रवाल यांची जागा सेफ मानली जात आहे. प्रभागात विविध विकास कामे खेचून आणल्याने शिवाय प्रभाग सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला झाल्याने आरक्षण सोडत त्यांच्यासाठी सकारात्मक असल्याचे मानले जाते. कॉँग्रेसचे गट नेते बाबुराव हिवाळे नेहमी निवडुन येत असलेल्या प्रभाग १० मधील १ जागा नेहमी प्रमाणे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाल्याने त्यांना या ठिकाणी पुन्हा निवडणूक लढविण्याची संधी मिळणार आहे. संगीता राजेश भुजबळ यांचा प्रभाग देखील कायम असल्याने पुन्हा त्यांना याच जागेवरून निवडणुक लढविण्याची संधी मिळू शकते. एकंदरीत निवडणुकीचा ज्वर वाढला आहे.

माजी नगराध्यक्षा विमल जेथलिया पुन्हा रिंगणात
माजी नगराध्यक्षा विमल जेथलिया रहिवाशी असलेल्या प्रभाग १० मध्ये एकूण तीन जागांपैकी एक जागा सर्व साधारण प्रवर्गासाठी खुली असणार आहे तर, दोन जागा सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असल्याने या ठिकाणावरून विमल जेथलिया पुन्हा निवडणूक रिंगणात उतरणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...