आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रूरतेचा कळस:जन्मदात्या वृद्ध आईला मारहाण‎ करून मुलानेच केला अत्याचार‎, जालन्यातील धक्कादायक घटनेने खळबळ

जालना21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका मुलानेच जन्मदात्या वृद्ध आईला‎ मारहाण करून अत्याचार केल्याची‎ धक्कादायक घटना जालना तालुक्यातील‎ एका गावात बुधवारी उघडकीस आली.‎ जालना तालुक्यातील एका गावातील 65‎ वर्षीय वृद्ध महिला आपल्या वृद्ध आणि‎ अपंग पतीसोबत राहते. त्यांना एक 27 वर्षीय मुलगा आहे. हा मुलगा अविवाहित‎ असून बाहेरील जिल्ह्यातील एका‎ शेतकऱ्याच्या शेतात सालदार म्हणून‎ कामाला आहे.

1 मे रोजी हा मुलगा सुटी‎ घेऊन गावी आला होता. रात्री जेवण‎ झाल्यानंतर वृद्धा व नराधम मुलगा घराच्या‎ अंगणात झोपले होते. त्या दिवशी त्याचे‎ वडील घरी नव्हते. रात्री बारा वाजेच्या‎ सुमारास मुलाने पायाला काहीतरी‎ चावल्याचे सांगून आईला घरात नेले.‎ त्यानंतर त्या मुलाने आईवर अत्याचार‎ केला.

विरोध केला असता, त्याने आईला‎ मारहाण केली. त्यानंतर त्याने तीन ते चार‎ वेळा आईवर अत्याचार केला. दुसऱ्या‎ दिवशी संशयित निघून गेला होता.‎ पीडित महिलेने हा प्रकार बहिणीला‎ सांगितल्यानंतर तिला उपचारासाठी‎ दवाखान्यात दाखल केले.‎

आरोपीला घेतले ताब्यात याप्रकरणी‎ पीडित महिलेच्या तक्रारीवरून मुलाविरुद्ध‎ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा‎ दाखल होताच, मौजपुरी पोलिसांच्या‎ पथकाने बुधवारी सकाळी संशयिताला‎ ताब्यात घेतल्याची माहिती योगेश धांडे यांनी‎ दिली.‎