आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिळाची लागवड शून्यावर:नगदी पिकांमुळे करडई, जवस पिकाचा पेरा घटला

जालना4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदलत्या पीक पद्धतीमुळे करडई आणि जवस लागवडीखालील क्षेत्र कमी झाले आहे. जालना जिल्ह्यात करडई २२ हेक्टरवर असून तीळ, सूर्यफूल, जवस या पिकांची लागवड जिल्ह्यात अद्याप निरंक झाली आहे.

यंदा बाजारात करडईची भाजीही फारशी दिसून आली नाही. सूर्यफुलाचे पीक, तीळ आणि जवस अादी पिके जिल्ह्यात नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. कमी कालावधीचे, कमी खर्चामध्ये उत्पादन शक्य असलेले जवस हे पीक आहे. या पिकाच्या कोरडवाहू क्षेत्रातही उत्तम उत्पादन देणाऱ्या ‘लातूर जवस-९३’ हे वाण लातूर येथील गळीत धान्य संशोधन केंद्रामध्ये विकसित करण्यात आले आहे.

परभणी येथे झालेल्या ॲग्रेस्कोमध्ये या वाणाची महाराष्ट्रातील कोरडवाहू क्षेत्रात लागवडीसाठी शिफारस करण्यात आली. करडईच्या तेलात औषधी गुण असून ते सांधेदुखी, खरूज व व्रणांवर वापरतात. करडईची पाने पाचक असतात. फुले कडू, शामक व काविळीवर गुणकारी असतात. जवसमध्ये ‘ओमेगा-३’ या मेदाम्लाचे प्रमाण सुमारे ५८% असते. जवस रक्तातील कॉलेस्टेरॉल चे प्रमाण कमी करते. त्याचप्रमाणे जवस हे अतिशय पौष्टिक असून त्यामधून आठ प्रकारची प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्वे व खनिजे मिळतात.

शेतकऱ्यांनी जवस, करडई, तिळाची लागवड करावी
जवसाच्या कड्यापासून तयार होणाऱ्या धाग्याची प्रत चांगली असल्यामुळे त्याचा पिशव्या, कागद व कपडे तयार करण्यासाठी उपयोग होतो. तरी शेतकऱ्यांनी जवस, करडई, तीळ व सूर्यफूल लागवड करून आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन कृषी विकास अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे यांनी केले.

ज्वारी ४४७१३ गहू २४३४२ मका ६४७५ हरभरा ४९०९७ करडई २२ जवस ०० तीळ ०० सूर्यफूल २.४ इतर १६ एकूण पेरणी १,२४, ६६७.४ हेक्टर सरासरी पेरणी ५७.२२ %

बातम्या आणखी आहेत...