आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोयाबीनची पेरणी:बीजोत्पादनाकरिता जिल्ह्यामध्ये 576 हेक्टरवर उन्हाळी सोयाबीनची पेरणी

सिंधी काळेगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खरीप हंगामात सोयाबीनच्या बियाणांनाचा मोठा तूटवडा निर्मान होतो. तसेच अनेक वेळा पैसे देऊन सूद्धा सोयाबीनचे बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरते. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरीच बियाणे तयार करण्यावर भर दिला आहे. जालना तालुक्यातील अनेक गावात उन्हाळी सोयाबीनचा प्रयोग करण्यात आला आहे. सिंधी काळेगाव येथील शेतकरी विष्णूपंत गिराम यांच्या शेतात जालना मंडळ कृषी अधिकारी अजय सुखदेवे यांनी पाहणी केली.

मागील खरीप हंगामापासून शासकीय प्रोत्साहानातून हा प्रयोग सूरू झाला आहे. जिल्हा कृषी अधिक्षक बाळासाहेब शिंदे यांनी मोठ्या प्रमानात जोड ओळ पद्धतीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली. त्यामुळे येत्या खरीपात सोयाबीनचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे भिमराव रनदिवे यांनी सांगितले. जालना तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने आत्मा शेती व्ययक्तीक शेतकरी यांना प्रोत्साहन देऊन सलग किंवा जोड पद्धतीने ५७६ हेक्टरवर लागवड करण्यात आले असल्याचे तालुका कृषी अधिकारी संतोष गाडे यांनी सांगितले.

या प्रयोगाबाबत जालना तालुक्यातील सिंधी काळेगाव येथील शेतकरी विष्णूपंत गिराम यांनी तूर व सोयाबीन चे अंतर पीक काढून घेतल्यानंतर मंडळ कृषी अधिकारी अजय सुखदेवे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन एकर क्षेत्रावर ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करून चार बाय सव्वा अंतरावर टोकन पध्दतीने लागवड केली. त्यांना २० किलो बियाणे लागले असून कीड व रोग व्यवस्थापन साठी ३ फवारण्या घेतल्या असून यामध्ये बेसल डोस सह विद्राव्य खतांचाही वापर केला आहे. आता या पिकाची वाढ जोमाने झाली असून सोयाबीन ला शेंगाही समाधानकारक लागल्या आहेत. एकरी १० क्विंटलपर्यंत उत्पन्न येण्याची शक्यता असल्याचे विष्णू गिराम यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी सोयाबीनचा वापर बीजोत्पादनासाठी करावा उन्हाळी सोयाबीनचा उतारा कीड व रोग आणि उन्हाची तीव्रता आणि कमी आर्द्रता यामुळे उत्पादन कमी येणार असल्याने सोयाबीन उत्पन्नासाठी न घेता त्याचा वापर बीजोत्पादन साठी करावा, असे आवाहन आत्माच्या प्रकल्प संचालक शीतल चव्हाण यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...