आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोयाबीन:बाजार समितीत सोयाबीनची आवक; भावात आली तेजी

आष्टीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

परतूर तालुक्यातील आष्टी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील चार दिवसांपासून सोयाबीनची आवक वाढल्याने भावात तेजी आली आहे.आष्टी व परिसरातील कमी खर्चीक व नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबिनची गतवर्षीपेक्षा यावर्षी मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली होती. मात्र ऐनवेळी आलेल्या पावसात शेतात कापणी करुन ठेवलेला सोयाबिन भिजल्याने सुरुवातीस शेतकऱ्यांना भाव कमी मिळाले होते.

काहीं दिवसांपासून पाऊस उघडल्याने शेतकरी रब्बी हंगामाच्या पेरणीकडे वळत असल्याने सोयाबिनची काढणी उरकत गहु, हरभरा, ज्वारीचे बियाणे घेत असल्याचे दिसत आहे. दरम्यान चार दिवसांपासून आष्टी कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबिनची आवक वाढल्याने व्यापारी बिटात उच्च बोली लावत असल्याने भावात ही तेजी झाली आहे. गुरुवारी ५ हजार ४०० रुपये भाव मिळाला. सोयाबिनला कमीत कमी ४ हजार ८९० तर जास्तीत जास्त ५ हजार ४०० रुपये भाव मिळत आहे.

बातम्या आणखी आहेत...