आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत मूल्य साखळी विकास शाळा हा उपक्रम असून त्या अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण, अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये पाच शेतकरी उत्पादक कंपन्यांची निवड केली आहे. या कंपन्यांतील दीड हजार शेतकऱ्यांचे प्रतिनिधींना सोयाबीन उत्पादन ते प्रक्रिया यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सोयाबीन रिसर्च सेंटरला पाठवण्यात आले आहे. सोयाबीनच्या प्रजाती, कीडरोग यावर नियंत्रण करण्याची पध्दती, सोयाबीनपासून तयार होणारे उत्पादन आदींचे प्रशिक्षण या कंपन्यांना दिले जात आहे. जिल्ह्यात स्मार्ट उपक्रमाने भरारी घेतली असून शेतकरी उत्पादक कंपन्यांना या प्रकल्पाचे मोठे बळ मिळाले आहे.
जिल्ह्यात पिकवल्या जाणाऱ्या प्रत्येक पिकावर प्रक्रीया करून त्याची विक्री करण्याचे तंत्र शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी या उपक्रमातून काम केले जात आहे. या अंतर्गत जिल्ह्यात अवघ्या चार ते पाच वर्षात लागवडीत सर्वाधिक पिकातील दुसरे स्थान मिळवणाऱ्या सोयाबीनची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, १२ ते १८ मार्च दरम्यान शेतकऱ्यांना मध्य प्रदेश येथील सोयाबीन संशोधन केंद्र तसेच प्रक्रीया उद्योग याची माहिती देण्यासाठी सुपर अॅग्राे हायटेक प्रो. कंपनी ली. जामवाडी, प्युअर अॅन्ड परफेक्ट अॅग्रीटेक फार्मर प्रोड्युसर कंपनी आदी कंपन्यांची निवड करण्यात आली.
सदरील कंपन्यांनी सोयाबीन यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प स्मार्ट अंतर्गत सादर केला आहे. ज्या माध्यमातून कंपन्यांतील दीड हजार शेतकरी हे सोयाबीन उद्योग प्रक्रियेतील उत्पादक ठरणार आहेत. या शेतकऱ्यांना मध्य प्रदेशातील सोयाबीन येथील संशोधन रिसर्च सेंटर येथे पाठवण्यात आले. हा प्रशिक्षण दौरा आत्माच्या प्रकल्प संचालक शीतल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे.
शेतकरी उत्पादक कंपन्यांना मिळणार संधी
स्मार्ट अंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्या सर्वांना यामध्ये सहभागी करून उपलब्ध शेतीमालाची काढणी ते त्यावर प्रक्रिया करण्यासाठीची माहिती उपलब्ध करून दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात पाच कंपन्या पात्र ठरल्या आहे. ज्या सोयाबीनवर प्रक्रिया करण्यासाठी इच्छुक आहेत. यासह जिल्ह्यातील सर्वच पिकांसाठी ही उपक्रम राबवला जाणार असल्याचे स्मार्टकडून सांगण्यात आले आहे.
बी निवड ते प्रक्रिया उद्योगाचे मार्गदर्शन
इंडीयन इन्स्टिट्यूट ऑफ सोयाबीन रिसर्च सेंटरकडून सोयाबीनच्या विविध प्रजाती विकसीत करण्यात आल्या आहेत. अधिक उत्पादन देणारी प्रजाती, रोग किडी तसेच त्याला प्रतिबंध करणारी औषधी, काढणी सोपी होण्यासाठीची यंत्रे याची माहिती देण्याबरेाबरच सोयाबीन पासून तयार केले जाणारे पदार्थ जसे सोयाबीन दूध, पनीर, सोया लस यासह इतर खाद्य पदार्थ प्रक्रीया याचेही धडे दिले जाणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.