आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:बीज प्रक्रिया केल्यानंतरच सोयाबीन पेरणी करावी : कृषि सहाय्यक गोवर्धन उंडे

वडीगोद्री19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चालू खरीप हंगामात सोयाबीन बियाणे पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया केल्यामुळे सुरुवातीला पिकाच्या वाढीच्या अवस्थेत ३५ ते ४० दिवसापर्यंत कोणत्याही रसशोषक किडींचा व चक्री भुंगा या किडीचा प्रादुर्भाव होत नाही, असे कृषि सहाय्यक गोवर्धन उंडे म्हणाले. अंबड तालुक्यातील दोदडगाव येथे तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली खरीप हंगामपूर्व बिजप्रक्रिया कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यावेळी समर्थ कारखान्याचे संचालक नरसिंह मुंढे, अशोक साकलळे, कृषी सह्ययक अशोक सव्वासे, गोरखनाथ मुंढे आदींची उपस्थिती होती. उंडे म्हणाले, शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी या संत वचनाप्रमाणे बियाणे शुद्ध तरच पीक निरोगी राहील.

यासाठी बीजप्रक्रिया करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बीजप्रक्रिया म्हणजे जमिनीतून किंवा बियाण्यापासून पसरणाऱ्या बुरशीजन्य व किटकजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तसेच रासायनिक खताची कार्यक्षमता वाढविणे आणि बियाण्याची उगवण क्षमता वाढून पीक निरोगी राहण्यासाठी जी रासायनिक घटक व जैविक संघाची बियाण्यावर केलेली प्रक्रिया म्हणजेच बीजप्रक्रिया होय. तसेच सोयाबीन लागवड करताना योग्य बियाणे निवड, बिज उगवण क्षमता, बीजप्रक्रिया, रुंद वरंबा सरी लागवड पद्धत, झाडातील अंतर, पेरणीची खोली, एकात्मिक खत व्यवस्थापन, किड व रोग व्यवस्थापन या अष्ट सूत्रीचा वापर करूनच येणाऱ्या खरीप हंगामात सोयाबीन पिकाची पेरणी करावी म्हणजे उत्पादनात १५ ते २० टक्के पर्यंत वाढ होते. सूत्रसंचालन कृषि सहाय्यक अशोक सव्वाशे यांनी केले. कार्यक्रमाला सुरेश मुंढे, रामेश्वर मुंढे, रामकिशन बडे, नवनाथ पोतकुले, बाळासाहेब मुंढे, मंगेश मुंढे, चंद्रकांत सानप, दिलीप वाघ, गणेश पवार, समाधान पवार आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...