आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी हवालदिल:सोयाबीन, मक्याचा उतारा घसरला, तर कपाशीच्या पहिल्या वेचणीत पऱ्हाट्या

जाफराबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांवर एकापाठोपाठ एक संकट कोसळत असून अतिवृष्टी व नापिकीने शेतकरी हवालदिल झाले अाहेत. सोयाबीन व मक्याचा उतारा घसरला, तर कपाशी पिकांचे पहिल्या दुसऱ्या वेचणीतच पऱ्हाट्या होत असल्याने पिकांना लागणारा खर्चही निघत नसल्याने परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.

अतिवृष्टीने सोयाबीन, मका पिकांचा उतारा पूर्णपणे घसरला तर शेतीत नांगरटी, कचरा वेचणी,त्यानंतर पहिली नंतर दुबार, तिबार लागवड झाली. त्यानंतर, खत, डवरे, निंदन, फवारणी अशा प्रकारे कपाशी पिकांना मोठया प्रमाणात खर्च झाला उसनवारीने शेतीचा खर्च सर्वाधिक झाला आहे. परंतु यावर्षी कपाशी पिकांची वाढ झाली नाही. कुठे हातभर, टोगंळा गळाभर तर कुठे कंबरभर कपाशी पिकांची वाढ झाली आहे. त्यावर ही लाल्यासह इतर ही रोगराई पसरली असून टोंगळाभर व कंबरभर कपाशी पिकांना बोंडयाही बोटावर मोजण्या इतक्याच लागल्याने फूटून फूटून कीती कापूस फुटणार व कीती कापूस होणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

यावर्षी पहिल्या वेचणीतच कपाशीची पऱ्हाटी झाल्याचे दिसून येत आहे. त्यातच कापसाला कमी भाव असुन वेचणाराला मात्र भाव आलेला आहे.वेचणारे ८ ते ९ रुपये किलो प्रमाणे कपाशीची वेचणी करीत आहे. त्यातच मजुरही मिळत नसल्याने आधीच अतिवृष्टीमुळे वाती झालेला कापुस झाडालाच वाळत असुन त्याचे दिवसेंदिवस वजनही घटत आहे. परिणामी कपाशी, सोयाबीन, मका या पीक उत्पादक शेतकऱ्यांची निराशा झाली असून शेतीला लागणारा खर्च सुध्दा निघणार नाही. या गंभीर बाबीची दखल शासनाने घेवून शेतकऱ्यांना भरघोष मदत जाहीर करावी अशी मागणी होत आहे.

ठेकेदारी व बटाईदार शेतकऱ्यावर नापिकीचे महासकंट
एकाचे दोन पैसे होईल म्हणून यावर्षी जवळपास ४० टक्के लोकांनी शेती ठोक्याने तर कोणी बटाईने केली. शेतीचा पहिल्यांदा व दूबार बि-बियाणे, खत, डवरे, निंदन, फवारणी असा एकत्रित खर्च मोठया प्रमाणात झाला झालेल्या खर्चाच्या तुलनेत उत्पादन माञ कमी झाल्याने शेतीला लागलेला खर्च ही निघाला नाही. होते नव्हते तेही गेले. शेती तोटात आल्यामुळे पुढच्या वर्षी शेतीला हात जोडतो अशी प्रतिक्रिया तपोवन गोंधन येथील ठोकेदार शेतकरी रामेश्वर गाडेकर यांनी सांगितले.

शेतीव्यवसाय तोट्यात
अतिवृष्टीने मका, कपाशी, सोयाबीन तर सडली तिला कोंबे फुटल्याने या तीन प्रमुख पिकांसह तुर, उडीद, मुग या खरीपांच्या पिकांचे उत्पादनात मोठया प्रमाणात घट आल्याचे डावरगावचे शेतकरी दुर्गेश नवले म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...