आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढदिवस साजरा:एसपी हर्ष पोद्दार यांनी केला  साधेपणाने वाढदिवस साजरा; एसपी हर्ष पोद्दार यांनी आपुलकी केंद्रात वाढदिवस साजरा केला.

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी आपला वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने शहरातील शहरी आपुलकी बेघर निवारा केंद्र येथे साजरा केला.

आठ दिवसांसाठी प्रभारी पोलिस अधीक्षक पदावर नियुक्त झालेले पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांना पुन्हा पुढील आठ दिवसांसाठी पोलिस अधीक्षक म्हणून बढती मिळाली. अशातच ८ मे रविवार रोजी त्यांच्या वाढदिवस होता. त्यांनी आपला वाढदिवस शहरी आपुलकी बेघर निवारा केंद्र येथे साजरा केला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, जालना येथे जरी आपला परिवार आणि मित्रमंडळी नसली तरी आपुलकी बेघर निवारा केंद्र येथील सर्व जण मला परिवारा सारखे आहेत. हर्ष पोद्दार यांनी ३६ व्या वर्षात पदार्पण केले. त्यांनी नॅशनल लॉ स्कूलमध्ये प्रवेशासाठी दिलेल्या परीक्षेत देशातून सहावे आले होते तर यूपीएससीच्या पूर्वपरीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर दिलेल्या मुलाखतीमध्ये देशात प्रथम आले होते.

असे यशाचे उच्च शिखर गाठलेला हा अधिकारी मात्र आजही जमिनीवर पाय ठेवून आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त एका सामान्य ठिकाणी “आपुलकी शहरी बेघर निवारा केंद्र’ या केंद्रात जाऊन बेघरांसोबत वाढदिवस साजरा करून त्यांनी खऱ्या अर्थाने” हर्ष” मिळविण्याचा प्रयत्न केला. यावेळी आपुलकी निवारा केंद्राचे अरुण सरदार, वैशाली सरदार, अपर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, एलसीबीचे पीआय, सुभाष भुजंग, पीआय मजहर सय्यद, पीआय ज्ञानेश्वर पायघन आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...