आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात चार-पाच ठाणे मिळून एक विभाग करण्यात आला आहे. जालना विभागात सदर बाजार, चंदनझीरा, बदनापूर, तालुका, कदीम हे ठाणे येतात. दरम्यान, जिल्ह्यात जेवढे गुन्हे घडतात. त्याच्या पन्नास टक्के हे जालना विभागातील गुन्हे असतात. सहा महिन्यांमध्ये ३३८ चोऱ्या झाल्या असून, केवळ ७४ चोऱ्यांचाच तपास लागला आहे. अजूनही २७४ चोऱ्यांतील आरोपी मुद्देमाल घेऊन मोकाट आहेत. दरम्यान, अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलिस अधिक्षकांनी एक नंबर दिला आहे. यामुळे जुगार, दारुबंदीच्या कारवाया मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. परंतू, चोऱ्यांचे तपास मोठ्या प्रमाणात प्रलंबीत आहेत. जालना विभागात आरोपी माेकाट राहण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. या विभागात मोठी शहरे आहेत. परंतू, त्या प्रमाणात पोलिसांचे मनुष्यबळही अधिक आहे. यामुळे एसपी साहेब जुगार, दारुबंदीच्या कारवाया वाढल्या. जालना विभागातून २७४ चोऱ्यांतील आरोपी अजूनही आहेत माेकाट, असा प्रश्न उपस्थित होत आहेत.
जालना विभागातील विविध् ठाण्यांच्या हद्दीत रोज कुठे ना कुठे ३ ते ४ घटना घडत आहेत. मागील सहा महिन्यांमध्ये घरफोड्या, जबरी चोऱ्या, चोऱ्या, लुटमार अशा ३३८ घटना घडल्या आहेत. मागील काही महिन्यांमध्ये व्यापारी, व्यावसायीकांना लुटण्याच्या घटनांमध्ये जालना शहरात घडल्या आहेत. यानंतर व्यापाऱ्यांनी थेट आयजींकडेही तक्रारी केल्या होत्या.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी विविध गुन्ह्यांतील आरोपी पकडले होते. औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक एम. मल्लीकार्जून यांनी आढावा घेऊन प्रलंबीत गुन्ह्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. जालना शहरातील वाहतूक शाखेसह नाक्याच्या गस्तीवर असलेल्या पोलीसांकडून संशयास्पद असलेल्या वाहन चालकांना न हटकणे, काळ्या काचा वापरुन चारचाकी वाहने चालविणाऱ्यांवर कारवाया होत नसल्यामुळे चोरटे दिवसा येऊन रेकी करुन जात आहेत.
यामुळे दिवसेंदिवस चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मागील काही दिवसांमध्ये गावठी कट्टे, रिव्हॉल्वर, चाकुचा धाक दाखवून लुटण्याचेही प्रकार घडले आहेत. शहरातील प्रत्येक पोलिस स्टेशन हद्दीतील प्रत्येक गुन्हेगारांना पकडण्यासाठी, गुन्हे उघड करण्यासाठी प्रत्येक ठाण्यांत डीबी पथके नेमली आहेत. तसेच प्रत्येक ठाण्यांसाठी एक अधिकारीही नेमलेले असतात. ठाण्यांचा व प्रभागात प्रलंबीत असलेले गुन्हे उघडकीस आणणे, कुठे गैरकारभार होत असेल तर त्यावर कारवाया करण्यासाठी डिवाएसपीही देखरेखीसाठी आहे.
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची कुठे उठबैस आहेेे, त्यांचे मित्र, कुटुंबाविषयक माहिती, फोटो यासह त्यांचा अभिलेख तयार करुन हद्दीत चांगले सोर्स अर्थात खबरे पेरण्याचे काम या पथकामार्फत होणे पोलीस अधिक्षकांना अपेक्षीत असते. मात्र, जालना विभागात चोऱ्या, घरफोड्या, लुटमारीच्या प्रलंबीत असलेल्या गुन्ह्यांच्या आकडेवारीतून या पथकांच्या ठाण्यातंर्गत बहूतांश गुन्हे तपासाविना प्रलंबीत राहत असल्यामुळे आरोपी मोकाट राहत आहेत. अनेक गुन्ह्यांचा वर्षानुवर्ष तपास होत नसल्यामुळे ते आरोपी पुन्हा-पुन्हा गुन्हे करीत आहेत. मागील सहा महिन्यांत घडलेल्या ३३८ चौऱ्यांपैकी केवळ ७४ चोऱ्यांचाच पोलीसांना तपास लागला आहे.
उर्वरीत चोऱ्यांतील आरोपी अजूनही फरार आहेत. येणाऱ्या काही दिवसांमध्ये आयजी जिल्ह्याचा आढावा घेणार आहेत. अशा प्रलंबीत राहीलेल्या गुन्ह्यांमुळे ज्या-त्या विभागांचे डिवायएसपी यांच्या दुर्लक्षामुळे गुन्हे प्रलंबीत राहण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. जालना जिल्ह्यात जालना, अंबड, भोकरदन, परतूर असे विभाग आहेत. या विभागातंर्गत १८ पोलिस ठाणे आहेत. विभागनिहाय जबाबदारी डिवायएसपींवर देण्यात आली आहे. जालन्यासाठी निरज राजगुरु, अंबडसाठी सुनील पाटील, परतूरसाठी मोरे तर भोकरदनसाठी इंदलसिंग बहुरे यांच्याकडे जबाबदारी आहे. सर्वात जास्त पोलिस मनुष्यबळ असतांना गुन्हे प्रलंबीत ठेवण्यात जालना विभाग जिल्ह्यात आघाडीवर आहे.
आयजी घेणार आढावा
आयजी एम. मल्लीकार्जून हे काही दिवसांमध्ये जालना जिल्ह्याचा आढावा घेणार आहेत. सध्या ते रजेवर असल्यामुळे नांदेडच्या आयजींकडे औरंगाबाद विभागाचा चार्ज आहे. यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये जालन्याचा आयजी आढावा घेणार असून, जिल्ह्यातून चोऱ्यांचे गुन्हे प्रलंबीत ठेवण्यात जालना विभाग त्यांच्या नजरेत येणारच आहे. दरम्यान, जालना जिल्ह्यात ७१३ चोऱ्या झाल्या आहेत. यात जालना विभागातच तब्बल ३३८ चोऱ्या झाल्या आहेत. यामुळे पोलिस अधिक्षकांनी या विभागात का जास्तीच्या चोऱ्या घडत आहेत. त्यातही या विभागातील केवळ ७४ चोऱ्यांचाच तपास लागत असल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालण्याची गरज आहे. प्रलंबीत गुन्ह्यांमुळे या ठिकाणी कोणता अधिकारी कमी पडतोय, याचाही विचार करावा.
सविस्तर माहिती घेऊन संबंधितास सूचना करतो
प्रलंबीत गुन्ह्यांबाबतची माहिती घेऊन पोलीस अधिक्षकांशी चर्चा करतो. वाढत्या चोऱ्या, मुद्देमाल रिकव्हर न होणे, आरोपी मोकाट राहणे याबाबत संपूर्ण माहिती घेऊन सुचना करतो. जालना विभागच तपासात का मागे आहे, याबाबतीत माहिती घेऊन सुचना करतो. कैलास गोरंट्याल, आमदार, जालना.
अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत
जालना विभागातील सर्वच अधिकाऱ्यांना प्रलंबीत गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले आहेत. कुचराई करणाऱ्यांवर कारवाई केली aजाणार आहे. चोऱ्यांतील आरोपींना पकडण्यासाठी क्राईम मिटींगमधून आढावा घेतला जात आहे. डॉ. अक्षय शिंदे, पोलिस अधिक्षक, जालना.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.