आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे:रेल्वेच्या ब्लॉकमुळे विशेष बस, 500 प्रवाशांना लाभ

जालना7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईनगरीत मध्य रेल्वेने पॉवर तसेच लाईन ब्लॉक १९ व २० नाेव्हेंबरदरम्यान घेतला. यामुळे जालन्यातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेमार्ग पूर्णत: बंद करण्यात आला होता. प्रवाशांना मुंबईसाठी सुविधा मिळावी म्हणून एसटीकडून पुणे ते मुंबई, जालना ते कुर्ला, पनवेल अशा विशेष गाड्या साेडण्यात अाल्या. या सेवेचा पाचशे प्रवाशांनी लाभ घेतला.

मराठवाडा मार्गावरील रेल्वेने जालना जिल्ह्यातून दिवसाला जवळपास १२ ते १५ हजार प्रवासी मार्गस्थ होतात. यामध्ये नेाकरदारांसह मुंबईला कार्यालयीन कामगार, व्यवसाय या निमित्ताने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. यामुळे हा रेल्वेमार्ग महत्वाचा आहे. दरम्यान, रेल्वेने १९ तसेच २० नोव्हेंबर या दोन दिवसांदरम्यान मुंबई पॉवर व लाईन ब्लाॅकचे नियोजन केल्याने या दोन दिवस मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे रद्द केल्या होत्या. परिणामी जालनेकरांना मुंबईसाठी महत्वाच्या कामासाठी जाण्यासाठी लालपरीचा सहारा मिळाला. प्रवाशांना जालना - पुणे - मुंबई, जालना - नाशिक - मुंबई, जाफराबाद - पुणे - मुंबई, जाफराबाद -कुर्ला - मुंबई, जाफराबाद - पनवेल - मुंबई अशा विशेष गाड्या सोडण्यात आल्या. दरम्यान, प्रवाशांनी अवैध प्रवासी वाहनातून प्रवास न करता राज्य परिवहन महामंडळाच्या सुरू करण्यात आलेल्या विशेष बससेवेचा लाभ घेतल्याचे जालना विभाग नियंत्रक प्रमोद नेव्हुल यांनी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...