आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष अभियान‎:सुकन्या समृद्धी योजनेत खाते‎ उघडण्यासाठी विशेष अभियान‎

जालना‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजादी का अमृत महोत्सवानिमित्त औरंगाबाद विभागामधील‎ सर्व डाक कार्यालयांमध्ये सुकन्या समृध्दी योजनेचे खाते‎ उघडण्यासाठी ९ व १० फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय विशेष‎ अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी‎ आपल्या कन्येचे भविष्य उज्ज्वल बनविण्यासाठी पोस्ट‎ ऑफिसच्या सुकन्या समृध्दी योजनेत गुंतवणूक करुन लाभ‎ घ्यावा, असे आवाहन औरंगाबाद विभागाचे डाकघर अधीक्षक‎ ए.के. धनवडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वार े केले आहे.‎

सुकन्या समृध्दी योजना ही मुलींचे शिक्षण व उज्ज्वल‎ भवितव्यासाठी कशी महत्वाची असेल याबाबत डाक कर्मचारी‎ ग्रामपंचायत, अंगणवाडी व बाल विकास प्रकल्प अधिकारी या‎ विविध घटकांमध्ये योजनेबाबत प्रबोधन करुन ९ व १० फेब्रुवारी‎ रोजी संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये सुकन्या समृध्दी योजनेची‎ खाती उघडणार आहेत. आठवडी बाजार, मंदिर, जत्रा, शाळा,‎ अंगणवाडी आदी ठिकाणी पालक मेळाव्याच्या माध्यमातून‎ योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचावी, असे प्रयत्न डाक‎ विभागाकडून केले जात आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...