आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परंपरा कायम ठेवत यंदा साहित्य संमेलनात बालकवींना स्थान:घनसावंगीच्या संमेलनात रंगणार विशेष बालकवींचे संमेलन

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाडा साहित्य परिषदेचे ४२ वे मराठवाडा साहित्य संमेलन जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे १० व ११ डिसेंबर रोजी होत आहे. यामध्ये एकूण ७ परिसंवाद तर ३ कविसंमेलने होणार आहेत. ऐतिहासिक परंपरा कायम ठेवत संमेलनाचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, यामध्ये बालकवी तसेच स्थानिक कवींसाठी परिसंवाद तसेच कविसंमेलनात वाढ केली आहे. यामुळे बालकवींना मोठे व्यासपीठ या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.

या संमेलनात ११ डिसेंबर रोजी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये ९.३० ते १०.३० वाजेदरम्यान बाल मेळावा आयोजित करण्यात आला आहे. याचे उद्घाटन इंद्रजित भालेराव करणार आहेत. साडेदहा ते एक वाजेपर्यंत बाल-कुमार लेखकांशी गप्पा साधला जाणार आहे. सुरेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बालकुमार लेखक गप्पा मारणार आहेत. ११.३० ते २ वाजेदरम्यान कवी दासू वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार आहे. याचे सूत्रसंचालन केशव खटिंग करणार आहेत. दरम्यान, बाल मेळाव्याला या वर्षी विशेष स्थान देण्यात आले आहे. यामध्ये बालकुमारांबरेाबर चर्चा होणार आहे. जे अभ्यासक्रमाला आहे त्या लेखकांच्या हस्ते ९३ विद्यार्थ्यांचा गौरव करणार आहेत. यामध्ये १४ शाळांतील ३०० विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

५ मुलांच्या कवितांचे सादरीकरण संमेलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजकांकडून जिल्ह्यातील शाळांमध्ये वादविवाद, वक्तृत्व, कवितावाचन स्पर्धा घेतल्या. यामध्ये प्रथम, द्वितीय तसेच तृतीय विजेते असलेल्या ९३ विद्यार्थ्यांची निवड केली. या विद्यार्थ्यांना इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते बक्षीस दिले जाणार आहे. शिवाय ५ निवडक मुलांच्या कवितांचे सादरीकरणही होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...