आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनजागृती:शाळा स्वच्छतेसाठी शिक्षण विभागाचा विशेष उपक्रम ; विद्यार्थ्यांवर स्वच्छता मॉनिटरची जबाबदारी

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची आवड निर्माण व्हावी कचरा इतरत्र टाकणाऱ्यांना लहान मुलांनी सांगितल्यास त्याचा परिणाम सकारात्मक होतो. ही बाब लक्षात घेता शालेय शिक्षण विभागाने इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळांत स्वच्छता मॉनिटर हा उपक्रम राबवण्यात येत आहे. हे विद्यार्थी शाळा, गावांसह इतर सर्वच परिसरात स्वच्छतेबाबत जनजागृती करणार आहेत. याची नुकतीच १३२ शाळांतील मुख्याध्यापकांबरेाबर बैठक घेण्यात आली आहे.

इयत्ता ५ वी ते ८ वीतील शालेय विद्यार्थ्यंांनी १९ नोव्हेंबर पर्यंत विद्यार्थी लोकांना बेफिकीर पणे कचरा फेकण्यापासून रोखण्यासाठी ‘मॉनिटर’ करावेत. कधीही आणि कुठेही कोणी कचरा टाकताना दिसल्यास ‘मॉनिटर’ नम्रपणे त्यांची चूक निदर्शनास आणून ती चूक सुधारण्यास कचरा कचराकुंडीत टाकावयास विनंती करावी. पालकांना सोशल मीडियावर शेअर करणे शक्य नसल्यास, विद्यार्थ्याने लोकांना कचरा टाकण्यापासून थांबवण्याच्या वेगवेगळ्या अनुभवांचे, घटनेचे एक छोटे वर्णन लिहून द्यावे. निवडलेल्या सर्वाधिक सक्रिय विद्यार्थ्यांना जिल्ह्याचा “स्वच्छता मॉनिटर” बनण्यासाठी प्रमाणपत्र देऊन गौरव केला जाणार आहे.

यासंदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीत राज्य समन्वयक रोहित आर्या, राज्य सह संचालक खंडू सदाफुले, गटशिक्षणाधिकारी गीता नाकाडे, प्रकाश कुंडलकर, जिल्हा समन्वयक श्रीकृष्ण निहाळ,गटसमन्वयक पी. आर. जाधव यांच्यासह केंद्रप्रमुख, साधनव्यक्तींसह मुख्याध्यापकांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...