आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणानंतर वाहनधारकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागपूर ते शिर्डीदरम्यानच्या पहिल्या टप्प्यात ५० हजारांहून अधिक वाहनांनी या महामार्गावरून प्रवास केला. ११ ते १९ डिसेंबरच्या काळात ५१ अपघात झाले. यातील २७ अपघात केवळ वन्य प्राण्यांचे झाले, तर चालकाला डुलकी लागल्याने सहा अपघात झाल्याचे समोर आले. ११ डिसेंबरला नागपूर ते शिर्डी हा समृद्धी महामार्ग टप्पा वाहतुकीसाठी खुला झाला. आठवडाभरातच ५० हजारपेेक्षा जास्त वाहनांनी या मार्गावरून प्रवास केल्याचेही महामार्ग प्रशासनाकडून पत्र काढण्यात आले. पण अपघाताचा मुद्दा भीषण बनला आहे. हिवाळी अधिवेशनातही याचे पडसाद उमटले.
काळजी घेऊनच महामार्गावर करा प्रवास; टायरमध्ये भरा नायट्राेजन हवा
वाहनाची करा तपासणी
{ ४० हजार किमीपेक्षा जास्त चाललेले टायर शक्यतो या मार्गावर चालवू नका
{ ब्रेक, लायनर, वायरिंगची तपासणी करून या मार्गावरून वाहने चालवावी.
{ चालकांनी टायरची लाइफ पाहून त्यात २८ ते ३० अशी हवा ठेवावी
{ टायरमध्ये शक्यतो नायट्रोजनचा वापर करावा, वायरिंगही तपासून घ्या.
{ अपघात झाल्यास १८००२३३२२३३, ८१८१८१८१५५ या हेल्पलाइनला बोला.
समृद्धी महामार्गाच्या या हद्दीत आतापर्यंत झाले अपघात
{शिर्डी ३
{वैजापूर २
{वेरूळ १
{औरंगाबाद १०
{ जालना ७
{ सिंदखेडराजा ४
{ मेहकर ३
{ मालेगाव ३
{ सेलू बाजार २
{ धामणगाव, वर्धा ७
{ वायफळ ४ या हद्दींमध्ये असे अपघात झाले आहेत.
डुलकीपासून सावधान
महामार्ग हा सरळ रेषेत असल्याने, वाहन चालवताना चालकाला “रोड हिप्नॉसिस’ म्हणजेच, झोप लागण्याची अवस्था निर्माण होते. किती वेगात जातोय, याचे भान चालकाला राहत नसल्याने अचानक झोप लागते.
लूटमारीचीही शक्यता
^पोलिस, अॅम्ब्युलन्स हात देत असेल तर थांबा, अन्यथा कुठेही थांबू नका. लूटमार होण्याचीही शक्यता असते. शक्यतो पेट्रोल पंपावर थांबून हवा तपासत राहावी.
- अभय दंडगव्हाळ, महामार्ग पोलिस.
वेग मर्यादा अशी
120 किमी प्रतितास कारसाठी
80 किमी प्रतितास मालवाहतुकीच्या वाहनांसाठी
100 किमी प्रतितास प्रवासी वाहनांसाठी वेग निश्चित
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.