आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:तंदुरुस्तीसाठी तायक्वांदोसारखे क्रीडा प्रकार आवश्यक‎

जालना‎21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

निरोगी सुदृढ व तणावमुक्त आनंदी‎ जीवन जगण्यासाठी‎ तायक्वांदोसारखे क्रीडाप्रकार‎ अवगत केल्यास लाभ होतो, असे‎ प्रतिपादन जिल्हा महिला व बाल‎ रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.‎ राजेंद्र पाटील यांनी केले.‎ जय बजरंग फाउंडेशन, जिल्हा‎ तायक्वांदो असोसिएशन व मराठा‎ महासंघाचा क्रीडा विभाग यांच्या‎ संयुक्त विद्यमाने आयोजित‎ जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेचे‎ उद्घाटन बुधवारी जिल्हा क्रीडा‎ संकुल येथे डॉ. पाटील यांच्या हस्ते‎ करण्यात आले, त्यावेळी ते बोलत‎ होते. अध्यक्षस्थानी शहर वाहतूक‎ शाखेचे पोलीस निरीक्षक गुणाजी‎ शिंदे, जिल्हा क्रीडा अधिकारी‎ अरविंद विद्याधर हे होते तर प्रमुख‎ पाहुणे म्हणून ओजस हॉस्पिटलचे‎ संचालक डॉ. क्रांतीसिंग लाखे‎ पाटील, कदिम जालना ठाण्याचे‎ पोलीस निरीक्षक सय्यद मजहर,‎ जय बजरंग फाउंडेशनचे उपाध्यक्ष‎ विनोद राऊत, ॲड. कल्पना‎ त्रिभुवन, धनसिंग सूर्यवंशी, अशोक‎ पडूळ, वैशाली सरदार, ॲड. शैलेश‎ देशमुख, दीपक देशपांडे, सुभाष‎ चव्हाण, राष्ट्रीय पंच सचिन आर्य,‎ जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे‎ अध्यक्ष अरविंद देशमुख आदींची‎ उपस्थिती होत.

या स्पर्धेत‎ जिल्हाभरातून १०० खेळाडूंनी‎ सहभाग नोंदविला. यावेळी‎ विद्याधर, वैशाली सरदार, पोलीस‎ निरीक्षक सय्यद, ॲड. त्रिभुवन‎ यांचीही समायोचित भाषणे झाली.‎ जय बजरंग फाउंडेशनचे अध्यक्ष‎ विपुल राय यांच्या सहकार्याने‎ ट्रॉफीज, प्रमाणपत्र व विजयी‎ खेळाडूंना मेडल उपलब्ध करून‎ देण्यात आले. काही कामानिमित्त ते‎ बाहेर राज्यामध्ये असल्याने त्यांनी‎ शुभेच्छा दिल्या.स्पर्धेत पंच म्हणून‎ मयूर पिवळ, सचिन गादेवाड, दिव्या‎ गायकवाड, वैष्णवी पळसकर,‎ पवण झोल, सुजन हतागळे, प्रांजल‎ पिवळ यांनी काम पाहिले.

युवा पिढी‎ सोशल मीडियात मग्न :‎ प्रास्ताविकपर भाषणात अरविंद‎ देशमुख यांनी युवा पिढी सोशल‎ मीडियात मग्न आहे. अशा‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ परिस्थितीत युवापिढीला मैदानाकडे‎ आकर्षित करण्याची गरज आहे.‎ तायक्वांदो खेळाच्या माध्यमातून‎ सर्वांग व्यायाम होतो. खेळामुळे‎ बुद्धीही तल्लख बनते. त्यामुळे‎ प्रत्येकाने कोणत्या का होईना क्रीडा‎ प्रकाराचा छंद जोपासावा, असा‎ मौलिक सल्ला त्यांनी दिला.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ दरम्यान, आजार, बुद्धिमत्तेला‎ चालना तसेच स्वतःला विकसित‎ करायचे असेल क्रीडा प्रकारात‎ सातत्याने सराव करणे हे प्रत्येकाच्या‎ जीवनात अनिवार्य आहे. तरच तुम्ही‎ कुठल्याही क्षेत्रांमध्ये जा, निश्चित‎ यशस्वी व्हाल, असा विश्वास डॉ.‎ लाखे यांनी व्यक्त केला.‎

क्रीडापटूंना पोलिस,‎ शासकीय सेवेत संधी‎

अध्यक्षीय भाषणात पोलीस‎ निरीक्षक गुणाजी शिंदे म्हणाले की,‎ तायक्वांदो हा खेळ कोरियन मार्शल‎ आर्ट असून, या खेळात प्राविण्य‎ प्राप्त केल्यास पोलीस खात्यासह‎ विविध शासकीय सेवेमध्ये‎ खेळाडूंना विशेष संधी दिले जाते. ही‎ बाब विद्या र्थ्यांसाठी करीअर म्हणुन‎ पाहण्यास भाग पाडते. म्हणून या‎ खेळाकडे खेळ म्हणून पाहण्यापेक्षा‎ करिअर म्हणून सुद्धा बघावे व‎ तायक्वांदोच्या माध्यमातून जिल्ह्याचे‎ नाव लौकिक करावे, असे आवाहन‎ त्यांनी केले.‎

बातम्या आणखी आहेत...