आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:खेळाकडे करिअरची संधी म्हणून पाहावे

भोकरदन11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजच्या काळात खेळ हा मनोरंजनाचा विषय नसून करिअर म्हणून खेळाडूंनी खेळाकडे पाहिले पाहिजे असे, प्रतिसाद जिल्हा क्रीडाधिकारी अरविंद विद्यागर यांनी केले आहे.

भोकरदन येथे क्रीडा व युवक सेवा संचलन महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेच्या वतीने भोकरदन तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२२-२३ मध्ये खो-खो मुलांची स्पर्धा या खेळाचे उद्घाटन प्रियदर्शनी मुलींचे वस्तीगृह मैदानावर माजी जि.प.सदस्य डॉ. चंद्रकांत साबळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती भोकरदनचे गटविकास अधिकारी बी. जी. सुरडकर, गटशिक्षणाधिकारी दिलीप शहागडकर, तालुका क्रीडा अधिकारी मोहंमद शेख, गटसमन्वयक एस. बी. नेव्हार, प्राचार्य विकास वाघ, मुख्याध्यापक शिमरे उपस्थित होते. विद्यागर म्हणाले, विद्यार्थी दशेतच उत्तम सराव करून खेळाचे कौशल्य मिळविता येते, तसेच शासनाने १० वी १२ वी व अन्य शिक्षणाच्या क्षेत्रात ग्रेस गुण व शासकीय नोकरीत ५ %आरक्षण दिलेले आहे.

त्यांना सरळ सेवेत सामावून घेतले जाते, अशी माहिती विद्यागर यांनी दिली. यावेळी डॉ. चंद्रकांत साबळे, दिलीप शहागडकर, बी. जी. सुरडकर यांनीही मार्गदर्शन केले. या स्पर्धेत १४ वर्ष वयोगटात श्री गणपती इंग्रजी विद्यालय भोकरदन प्रथम तर गणपती मराठी विद्यालय भोकरदन यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. १७ वर्ष वयोगटात श्री गणपती इंग्रजी विद्यालय भोकरदन प्रथम तर दुर्गामाता विद्यालय सोयगाव देवी द्वितीय क्रमांक मिळविला. १९ वर्ष वयोगटातील सामना श्री रामेश्वर कनिष्ठ महाविद्यालय भोकरदन यांनी जिंकला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा अशोक नवगिरे यांनी केले.प्रास्ताविक क्रीडाधिकारी मोहंमद शेख यांनी केले. क्रीडा संयोजक कृष्णा जंजाळ यांनी मानले. या स्पर्धेला यशस्वी होण्यासाठी क्रिडा मार्गदर्शक किरण साळवे, अजय मतकर, नितेश बोर्डे, गौतम खाडे, श्री.वाळवी, संजय पवार, सुनील जंजाळ, जी. आर. जाधव, अवसरमल ,तायडे आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...