आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्यपालची सत्यवाणी:शिव, फुले, आंबेडकरांचे विचार घराघरात पोहोचवा; सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराजांचे आवाहन

आष्टी23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आणि उद्धारासाठी छत्रपती शिवाजी महाराज, म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपली उभी हयात घालवली. अशा बहुजनवादी सर्वच संत महापुरुषांचे विचार घराघरात गेले पाहिजे असे प्रतिपादन सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज यांनी केले.

आष्टी येथे आयोजित शिव, फुले, आंबेडकर जन्मोत्सव निमित्त कार्यक्रमात सत्यपाल महाराजांचा प्रबोधनातून मार्गदर्शन केले. यावेळी सपोनि शिवाजी नागवे यांची उपस्थिती हेाती. एकीकडे मंदिराचे दरवाजे सोन्याचे बसविले जात आहेत मात्र दुसरी बाजू बघितली तर जिल्हा परिषद शाळेची अवस्था एखाद्या गोठ्या गत झाली आहे. याचा विचार केला पाहिजे, सत्यपाल महाराज म्हणाले, राजकीय पुढाऱ्यांनी आपल्या परिवारापलीकडे कधीच इतरांचा विचार केला नसून राजकारणात आपली पत्नी, मुलगा, सून असे सर्वच कुटुंब सत्येच्या खुर्चीवर बसवतात आणि आपल्या तरुणांना झेंडे घेऊन मागे फिरवतात ही बाब ओळखून घेतली पाहिजे. प्रास्ताविक उद्धव डोळस यांनी केले. सूत्रसंचालन गौतम शेळके यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आगलावे, वाघमारे, थोरात, सोळंके, मोरे, आढे, राठोड, कुरेशी, पठाण आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...