आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:अवैध दारूच्या अड्ड्यांवर पथकाच्या धाडी, नऊ जणांवर गुन्हा दाखल

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाताळ व नवीन वर्षानिमित्त राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने मंगळवारी शहरातील लोधी मोहल्ला व कैकाडी मोहल्ला येथे सुरू असलेल्या अवैध दारूच्या अड्ड्यांवर पोलिसांनी छापा टाकून ९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून ९० लिटर हातभट्टी दारू व ४६०० लिटर रसायन असा एकूण १ लाख २० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, संचालक सुनील चव्हाण, उपआयुक्त प्रदीप पवार, पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे, अधीक्षक पराग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात नाताळ व नवीन वर्षानिमित्त अवैध दारूच्या अड्ड्यांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत मंगळवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कैकाडी मोहल्ला व लोधी मोहल्ला येथे सुरू असलेल्या अवैध दारूच्या अड्ड्यांवर छापा टाकला. या वेळी ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात ९० लिटर हातभट्टी दारू व ४६०० लिटर रसायन असा एकूण १ लाख २० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई अधीक्षक पराग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली एस. ए. गायकवाड, एम. एन. झेंडे, आर. एन. रोकडे, भी. सु. पडूळ, पी. बी. टकले, सं. म. पवार, ए. ए. औटे, वि. पांं. राठोड, ए. आर. बिजुले, आर. ए. पल्लेवाड, व्ही. डी. पवार, व्ही. डी. अंभोरे, के. एस. घुणावत, एस.टी. डहाळे, डी. जी. आडेप यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...