आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शोभायात्रा:व्यंकट रमणा गोविंदाच्या गजरात श्री बालाजीची लक्षवेधी शोभायात्रा

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री वेंकटेशा, गोविंदा, वेंकटरमना, गोविंदा, गोविंदाच्या गजरात छत्रपती संभाजी महाराज नगर परिसरातील श्री. बालाजी मंदिर संस्थान तर्फे नवरात्र ब्रह्मोत्सवानिमित्त आठव्या माळीस सोमवारी काढलेल्या शोभायात्रेने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.संस्थानच्या वतीने दोन दशकांपासून श्री. बालाजी भगवान नवरात्र ब्रम्होत्सव साजरा केला जातो. यंदा ही गत आठवडाभरापासून विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहेत.प्रतीवर्षाप्रमाणे आज भगवान बालाजी यांची जालना शहरातून शोभायात्रा काढण्यात आली.

बडी सडक स्थित श्रीराम मंदिर येथे मनोज महाराज गौड यांच्या हस्ते विधिवत पूजा करून शोभायात्रेस प्रारंभ झाला. यावेळी मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष अंकुशराव राऊत, मुख्य यजमान सुभाषचंद्र देवीदान, कश्मीरीलाल अग्रवाल, आर. आर. खडके, ज्ञानदेव पायगव्हाणे, गोवर्धन अग्रवाल, सुखदेव बजाज, विठ्ठलराव घुले, निवृत्ती महाराज पाचफुले, दिगंबरराव पेरे, विठ्ठलराव शिर्के, हिरालाल पिपरिये, प्रकाश जगताप, मुन्ना गजबी, हिम्मतराव शिंदे, रोशन चौधरी, कारभारी वाघ, मनोज पाचफुले, दिनेश शिनगारे, नानाभाऊ उगले, अरुण मसाने, सतीश जाधव, भरत गादिया, दाभाडे, कोल्हे, योगीराज महाराज लोखंडे यांच्यासह भाविकांची उपस्थिती होती.

श्री राम मंदिर येथून निघालेली शोभायात्रा टांगा स्टॅन्ड, फुल बाजार, सिंधी बाजार, मामा चौक, बस स्थानक, राऊत नगर मार्गे जात बालाजी मंदिर येथे विसावली. यात्रेसमोर खास खानदेशातील बँड पथक ,टाळ मृदुंगाच्या गजरात अभंग म्हणणारे बाल वारकरी आकर्षक ठरले.

बातम्या आणखी आहेत...