आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुद्ध अंत:करण:सर्वांच्या कल्याणासाठी श्रीमद्भागवत ग्रंथ होय ; भागवताचार्य सखाराम महाराज सराफ यांचे प्रतिपादन

आन्वा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीमद् भागवत ग्रंथ हा सर्वांच्या कल्याणासाठी भगवंताचा ग्रंथ रुपात झालेला अवतार आहे, असे प्रतिपादन भागवताचार्य सखाराम महाराज सराफ यांनी केले.भोकरदन तालुक्यातील आन्वा येथे श्रीमद भागवत कथा सुरु आहे. भागवत हे स्वतः श्रीकृष्णच आहेत. असे श्रीकृष्ण रूप असलेले भागवत श्रवण केल्याने ऐकणाऱ्याच्या सर्व पापांचा नाश होतो. तसेच कथा ऐकताना कृष्ण कानाद्वारे हृदयात प्रवेश करतात आणि हृदयात कृष्ण आले की हृदयातील काम, क्रोध, लोभ, अहंकार आदी विकार निघून जातात.

श्रोत्यांचे अंत:करण शुद्ध होऊन त्याला परम शांतीचा लाभ होतो. त्याचे मन भगवंताविषयी प्रेमाने भरून जाते व मग त्यांनतर त्याला सर्वांभूती भगवंत दिसू लागतो. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत असा हा भक्तीयोग भागवताच्या श्रोत्यांना प्राप्त होतो. भक्ती योग सिद्ध झाल्यामुळे त्याच्या जीवनात आमुलाग्र बदल होतो त्यांचे जन्माचे सार्थक होते. मनुष्याचे सर्व उपाधी व भेद मावळून जातात तो सर्वां विषयी प्रेम, करुणा आणि कृतज्ञतेच्या भावनेने भरून जातो. अशा प्रकारे भागवत श्रवण केल्याने एका प्रेममय भक्तीमय समाजाची निर्मिती होते. याद्वारे समाजातील द्वेष, घृणा, हिंसा, पाप व अधर्म यांचा नाश होतो. अशी ही श्रीमद् भागवत कथा सर्वांनी नेहमी ऐकावी त्यातही श्रावण मास अत्यंत फळ देणारा काळ असल्याचे सखाराम महाराज सराफ यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...