आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघनसावंगी तालुक्यातील श्रीक्षेत्र जांबसमर्थ येथील समर्थ मंदिरात येत्या २४ डिसेंबर रोजी श्रीराम याग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्त श्री रामभक्त व श्री समर्थ भक्तांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन माजी न्यायाधिश विजय पाटणुरकर यांनी केले आहे.
नुकताच सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या देव्हाऱ्यातील अर्थात जांबसमर्थ येथील पंचधातूंच्या प्राचीन श्रीराम प्रभू, सीतामाता, लक्ष्मणजी, हनुमानजी यांच्यासह इतर मुर्त्या काही दिवसांपूर्वी चोरी गेल्या होत्या. अनपेक्षित घडलेल्या या प्रकाराने संपूर्ण राज्यासह देशभरात मोठी खळबळ उडाली होती. परंतू प्रशासन व पोलिस तपास यंत्रणा यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखत आपल्या तपासाची चक्रे जलद गतीने फिरवून आरोपींना जेरबंद केले.
मुर्त्यांचा पुनःस्थापना सोहळाही संपन्न झाला याच पार्श्वभूमीवर श्रीराम याग सोहळा आयोजित करण्यात आला असून शनिवारी सकाळी ८ ते ९ 9 पुण्याहवाचन व गणपती अभिषेक, सकाळी ९ ते १० मातृकापूजन, नांदिश्राद्ध, सकाळी १० ते ११ वास्तुपूजन, क्षेत्रपालन पुजन, नवग्रह स्थापना, इशान्य कलश स्थापना, कुंडपूजन, अग्नि स्थापना, मुख्य हवन श्रीराम नाम मंत्र घोष व पुर्णाहुती, आरती व नंतर महाप्रसाद होईल. या श्रीराम याग सोहळ्याचे पौरोहित्य भीमराव जोशी (रामदासी) हे करणार आहेत. या सोहळ्यास पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन माजी न्यायाधीश विजय पाटणुरकर, जीवन जोशी, किरण जोशी यांच्यासह जांबसमर्थ येथील समस्त ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.