आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्जन्यमान:धावड्यात अनेकांच्या शेतात साचले पाणी; एक तास धावडा परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

धावडा2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील धावडा येथे बुधवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह पाऊन तास जोरदार पाऊस पडून अनेकांच्या शेतातून पाणी वाहून गेले. यामुळे शेतात पावसाचे पाणी साचून तळ्याचे स्वरूप आले.

ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली होती व ज्यांना पेरायचे आहे ते या भागातील शेतकरी सुखावला. धावडा गावाच्या उत्तरेस डोंगरी भागात तुरळक व काही ठिकाणी काहीच नाही असा पाऊस पडल्याने त्या भागातील पेरण्या खोळंबल्या. परिणामी शेतकऱ्यांच्या चिंतेत पुन्हा वाढ झाली आहे.

रोहिणी, मृग नक्षत्र कोरडेच गेले असून पेरणीयोग्य पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करु नये, असे आवाहन भोकरदन तालुका कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...