आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मृतिदिन:100 सेकंद स्तब्ध उभे राहून छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन; लोकराजा, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याला दिला उजाळा

जालना14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १०० व्या स्मृतिदिनी जालना जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. १०० सेकंद स्तब्ध उभे राहून अभिवादन करण्यात आले.

भोकरदन शहर
भोकरदन । आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शंभराव्या पुण्यतिथी निमित्त शूक्रवारी मित्रमंडळ भोकरदनच्यावतीने महात्मा फूले चौकात आदरांजली वाहण्यात आली. छत्रपती शाहू महाराज यांच्या शंभराव्या पुण्यतिथीनिमित्त शंभर सेकंद उभे राहून लोकराजाला अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष हर्षकुमार जाधव, महादुसिंग राजपूत, पंढरीनाथ खरात, साहेबराव झोरे, फैसल चाऊस, सुरेश तळेकर, भूषण शर्मा, राजपूत, महेश पुरोहित, गणेश ठोंबरे, नईम कादरी, शमिम मिर्झा, खोमणे, जीवरग, हमदू चाऊस, जफर सेट, मुकुंदा इंगळे, शेषराव शिंदे, शामराव दांडगे, विकास जाधव नारायण लोखंडे, रावसाहेब कोरडे, सुहास जाधव, मधुकर ढोले, शंकर सपकाळ, बावस्कर, जयंत जोशी, समता परिषदेचे राजेंद्र दारुंटे, विलास शिंदे, राजू इंगळे आदी होते.

सिद्धार्थ महाविद्यालय
जाफराबाद । येथील सिद्धार्थ महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज स्मृतीदिनानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. श्याम सर्जे यांच्या अध्यक्षतेखाली व उपप्राचार्य डॉ. सुनील मेढे यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन सभा घेण्यात आली. प्राचार्य, डॉ. शाम सर्जे यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या जीवन चरित्राचा आढावा घेताना शाहू महाराजांचे विचार प्रत्यक्षात आणले तरच सर्वांगीण विकास साध्य होऊ शकतो, असे सांगितले. यावेळी प्रा. डॉ. कैलास पाटील, प्रा. डॉ. रमेश देशमुख. प्रा. मनिष बनकर प्रा. डॉ.अनिल कांबळे आदींची उपस्थिती होती. सुत्रसंचालन प्रा. डॉ. गजानन जाधव यांनी तर प्रा. सुदाम पाटील यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते.

खोमणे महाविद्यालय
जालना । तालुक्यातील नाव्हा येथील कै. संतुकराव खोमणे महाविद्यालयात राजश्री छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी दिनानिमित्त प्रा.चंद्ररेखा गोस्वामी यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रा.अश्विनी क्षीरसागर, स्वाती पुराणिक, सुमित्रा खोतकर, ऋषिकेश अंभोरे, भगवान भुतेकर आदी उपस्थित होते.

बद्रीनारायण बारवाले
जालना । येथील बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे आयोजित “शाहू कृतज्ञता पर्व वंदन लोकराजाला” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी दहा वाजता विविध वर्ग सुरू असताना प्रत्येकानी आपापल्या जागेवर १०० सेकंद उभे राहून शाहू राजांना वंदन केले. यावेळी प्राचार्या कविता प्राशर, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.सुनीता भराडे, डॉ. निशिकांत लोखंडे, प्रा. प्रियदर्शन भवरे, डॉ.शशिकांत चौधरी, प्रा. संदीप पाटील, डॉ.नीलेश बर्डे, डॉ.रवींद्र भोरे, डॉ. बळीराम कटारे, डॉ.उद्धव थोरवे, प्रा.संभाजी कांबळे, डॉ.माधव हेबाडे, डॉ.व्यंकटेश कोरेबोईंवाड यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शाहू महाराज इंग्लिश स्कूल जालना । शहरातील कन्हैयानगर परिसरातील राजर्षी शाहू इंग्लिश स्कूलमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त संस्थेचे सचिव डॉ. सुखदेव मांटे व संस्थेच्या अध्यक्षा रेवती मांटे यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सहशिक्षक मंगेश वारे, स्वाती वीर, शिक्षकेत्तर कर्मचारी यमुना ढोके आदीची उपस्थिती होती.

टोपे महाविद्यालय, जालना
जालना । राजर्षी शाहू महाराज यांनी धर्मसत्तेची गुलामगिरी तोडण्याचे काम केले ते जाणते राजे होते. त्यांनी जनतेच्या कल्याणासाठी आपले संपूर्ण जीवन समाजसेवेसाठी समर्पित केले तसेच समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम केले असल्याचे महाड येथील प्रा. गौतम गुडदे यांनी केले. अंकुशराव टोपे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्र.प्राचार्य डॉ. दादासाहेब गजहंस अध्यक्षस्थानी होते. प्रा. गुडदे म्हणाले, राजर्षी शाहू महाराज हे समताधिष्ठित व्यक्तिमत्त्व होते त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शैक्षणिक कार्यासाठी मदत केली. तसेच ते आरक्षणाचे जनक होते.

याप्रसंगी सीपी अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बद्रीनाथ कान्हेरे यांनी आपले विचार व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. गजहंस म्हणाले, आज रोजी फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा पुढे नेण्याची गरज आहे. तसेच शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तन झाले पाहिजे. आज रोजी शाहू महाराजांचे विचार अंगीकृत करुन मत्स्योदरी शिक्षण संस्था काम करीत आहे. यावेळी उपप्राचार्य डॉ. संजय पाटील, डॉ शांताराम रायपुरे, डॉ. पंडीत रानमाळ, डॉ. रामदास वैद्य, डॉ. कृष्णा कदम, गुसिंगे, सुरेश चव्हाण, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. मसूद अन्सारी, डॉ. सीमा निकाळजे, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते. सूत्रसंचालन सुरेंद्र पडगलवार यांनी तर प्रा. अविनाश भालेराव यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...