आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारितोषिक:ज्युनियर आयएएस स्पर्धा परीक्षेत स्वरालीला राज्यस्तरीय पारितोषिक

अंबड6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील कै. दत्ताजी भाले प्राथमिक विद्यालयातील स्वराली विकासकुमार ढोले या विद्यार्थिनीने ज्युनियर आयएएस - बीटीएस स्पर्धा परीक्षेत राज्यस्तरीय पाचवा क्रमांक मिळवला. त्याबद्दल स्वरालीचा पालकांसोबत अभिनव गोयल लातुर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

या विद्यार्थिनीस बीटीएस मारोती झाल्टे, स्पर्धा परीक्षा मेघा वायकोस, सुवर्णलता खानापूरकर यांनी मार्गदर्शन केले. तिच्या या यशाबद्दल केंद्रीय अध्यक्ष डॉ. सुरेंद्र अलूरकर, केंद्रीय कार्यवाह डॉ. हेमंत वैद्य, स्थानिक अध्यक्ष व्यंकटेश गोसावी, केदार मंत्री, शालेय समितीचे अध्यक्ष श्रीपाद जपे, ज्योती ठाकूर, मुख्याध्यापक विष्णू सोनवणे आदींनी अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...