आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जालन्यात ८ जानेवारी रोजी राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला मराठा समाजाचे प्रमुख समन्वयक उपस्थित असणार आहे. महापुरुषांबद्दल राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून अवमानजनक वादग्रस्त वक्तव्याची मालिका अजूनही सुरूच आहे. याचा या बैठकीत निषेध नोंदवला जाणार असून आरक्षणासह मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली जाणार आहे.
या बैठकीच्या पूर्वतयारीसाठी जालन्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची जालन्यात बैठक पार पडली. या बैठकीनंतर मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. या वेळी मराठा क्रांती मोर्चा जालना येथील राज्य समन्वयक डॉ. संजय लाखे पाटील, जगन्नाथ काकडे, जिल्हाध्यक्ष विजय वाडेकर, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख, अशोक पडूळ, शेख महेमुद, संतोष कर्हाळे, सुभाष चव्हाण, सुभाष कोळकर, राजेंद्र गोरे, किरण गरड अादींची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.