आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यस्तरीय स्पर्धा:शहरातील 25  योगपटूंची राज्य स्तरावर निवड ; विविध मान्यवरांची उपस्थिती

जालना24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हीएसएस महाविद्यालय जालना आणि जिल्हा योगासन स्पोर्ट संघटनेच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी जिल्ह्यातील २५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. उद्घाटन डॉ. बळीराम बागल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सी.ए. नितीन तोतला, डॉ. प्रसाद मदन, डॉ. हेमंत वर्मा, योगशिक्षक प्रल्हाद हरबक, मनोज लोणकर, सच्चिदानंद जहागीरदार, गौरव धोत्रे, अॅड तरडे, राहुल सरकटे, विश्वंभर शिंदे, सुरेश बाहुले यांची उपस्थिती होती. या स्पर्धेत निवडण्यात आलेले खेळाडू महाराष्ट्रासाठी खेळणार असल्याची माहिती डॉ. प्रसाद मदन यांनी दिली. सूत्रसंचालन श्वेता पटवारी यांनी केले. कार्यक्रमाला प्रा. रोहित पिपरिये, सतीश कंठाळे, जयेश मीनासे, प्रतीक्षा वाहूळ, नम्रता देशमुख आदी उपस्थित होते.

स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे. ट्रॅडिशनल प्रकारात सब ज्युनिअर मुली: वैष्णवी सोळंके प्रथम, चिन्मय शिंगणे दृतीय, सिद्धी मसवले तृतीय, समीक्षा खंडेलवाल चतुर्थ, आकांक्षा पाल पाचवी. सब ज्युनिअर मुले: कृष्णा परदेशी प्रथम, कल्पेश पांगारकर द्वितीय, भावेश वलकट्टी तृतीय, सर्वेश पांगारकर चतुर्थ, सार्थक चौधरी पाचवा. ज्युनियर मुली: यशोदा हरिश्चंद्र विश्वकर्मा प्रथम व अर्टिस्टिक सिंगल, प्रथम सीनियर मुले अंकुश श्रीराम गाडे प्रथम, कृष्णा उगले द्वितीय, अर्टिस्टिक सिंगल, प्रथम, पंचारिया कृष्णा संजय तृतीय जूनियर मुले : अमोल रसाळ, प्रथम रिदामिक पेअर सब ज्युनिअर मुली प्रथम: चिन्मयी शिंगणे आणि समीक्षा खंडेलवाल रिदामिक पेअर सब ज्युनिअर मुले प्रथम कृष्णा परदेशी, रितेश राऊत, आर्टिस्टिक सिंगल सब ज्युनिअर मुली चिन्मयी शिंगणे प्रथम, समीक्षा खंडेलवाल द्वितीय, भाविका उपाध्याय तृतीय, युतिका अग्रवाल चतुर्थ सब ज्युनिअर मुले कृष्णा परदेशी प्रथम, भावेश वलकट्टी द्वितीय, रितेश राऊत तृतीय, सार्थक चौधरी चतुर्थ, आदेश नागरे पाचवा सब ज्युनिअर मुली अर्टिस्टिक पेअर: भाविका उपाध्याय आणि समीक्षा खंडेलवाल प्रथम, मुले, कृष्णा परदेशी आणि रितेश राऊत प्रथम यांनी यश मिळवले. दरम्यान, याप्रसंगी विविध मान्यवरांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...